"उद्धवसेनेने मुस्लीम महापौर बनवला, हे खूप चांगले केले कारण...", शिंदेंच्या नेत्याचे ठाकरेंवर 'बाण' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:01 IST2026-02-12T16:59:37+5:302026-02-12T17:01:19+5:30

परभणी महापालिकेच्या महापौरपदी उद्धवसेनेचे सय्यद इकबाल खाजा हे निवडून आले आहेत. त्यावरूनच शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी निशाणा साधला. 

"Uddhav Sena made a Muslim mayor, it was a very good thing because...", Shinde's leader 'shoots' at Thackeray | "उद्धवसेनेने मुस्लीम महापौर बनवला, हे खूप चांगले केले कारण...", शिंदेंच्या नेत्याचे ठाकरेंवर 'बाण' 

"उद्धवसेनेने मुस्लीम महापौर बनवला, हे खूप चांगले केले कारण...", शिंदेंच्या नेत्याचे ठाकरेंवर 'बाण' 

परभणी महापालिकेच्या महापौरपदी उद्धवसेनेने सय्यद इकबाल खाजा हे निवडून आले आहेत. मुंबईत मराठी महापौराचा मुद्दा लावून धरलेल्या उद्धवसेनेने परभणीमध्ये मुस्लीम महापौर दिल्याने विरोधकांना टीकेची संधी मिळाली. शिंदेसेनेचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर मुस्लीम महापौर निवडीवरून टीकास्त्र डागले आहे. 

शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटले की, "परभणी महापालिकेमध्ये उबाठाने सय्यद इकबाल यांना महापौर बनवले आहे. खूपच चांगले केले आहे, कारण की उबाठाजवळ जर कुठली मजबूत व्होट बँक असेल, तर ती मुस्लीम व्होट बँक आहे."

'मुंबईतही कोणीतरी खान किंवा पठाण महापौर झाला असता'

"जर मुस्लीम समाजाने उबाठाच्या उमेदवारांना भरपूर मतदान केले नसते, तर मुंबईमध्येही त्यांना दुहेरी आकडा गाठणे अवघड होते. जर मुंबईमध्ये महायुतीने झेंडा फडकावला नसता, तर मुंबईचा महापौरही कोणीतरी खान किंवा पठाण झाला असता", अशी टीका निरुपम यांनी ठाकरेंवर केली आहे. 

निरुपम पुढे म्हणाले की, "असो, परभणीमध्ये उद्धवजींनी त्यांच्या निष्ठावान मतदारांच्या ऋणाची परतफेड केली आहे. मुस्लीम मतांसाठी आधी हिंदूंना धोका दिला. आता मराठी समाजालाही अंगठा दाखवला आहे. अजूनही जनाब बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार असल्याचे ढोंग करणार आहे का?", असा सवाल निरुपम यांनी केला आहे. 

मुस्लीम समुदायाचा महापौर पद का?

परभणी महापालिकेत उद्धवसेनेने २५ जागा जिंकल्या आहेत. यात १३ नगरसेवक हे मुस्लीम समुदायातील आहेत. परभणीत बहुमताचा आकडा ३४ आहे. काँग्रेसला सोबत घेत उद्धवसेनेने सत्ता स्थापन केली आणि मुस्लीम समुदायातील सर्वाधिक नगरसेवक असल्याने महापौरपदी मुस्लीम नगरसेवकाला संधी दिली गेल्याचे उद्धवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.

 

Web Title: "Uddhav Sena made a Muslim mayor, it was a very good thing because...", Shinde's leader 'shoots' at Thackeray