महायुतीने जानकरांना फसवलं, सोयीच्या राजकारणासाठी परभणीत पाठवलं; अंबादास दानवे
By मारोती जुंबडे | Updated: April 2, 2024 19:25 IST2024-04-02T19:21:48+5:302024-04-02T19:25:30+5:30
बारामती मतदारसंघात सोयीच्या राजकारणासाठी अजित पवारांनी जानकरांना परभणीला पाठवले

महायुतीने जानकरांना फसवलं, सोयीच्या राजकारणासाठी परभणीत पाठवलं; अंबादास दानवे
परभणी : महाविकास आघाडीकडून माढा लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा असतांना जानकरांनी महायुतीशी घरोबा केला. परंतु, महायुतीने त्यांची फसवणूक करून बारामती मतदारसंघात सोयीच्या राजकारणासाठी अजित पवारांनी जानकरांना परभणीला पाठवल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी (दि.२) येथे केली.
दानवे म्हणाले की, सातत्याने इंधनाचे दर वाढत असून शेतकऱ्यांची सरकारकडून दिशाभूल होत आहे. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सेनेकडून संजय जाधव यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. त्यानिमित्ताने रॅली काढली होती. यावेळी दानवे यांनी महायूतीवर टिकेचा भडीमार केला. यावेळी माजी मंत्री आ. राजेश टोपे, खासदार फौजिया खान, माजी खा. अॅड. तुकाराम रेंगे, आमदार सुरेश वरपुडकर, आ.डॉ. राहुल पाटील, आ. राजेश राठोड, माजी आ. विजय भांबळे, सुरेश देशमुख, सिताराम घनदाट, सुरेश जेथलिया, अॅड. विजय गव्हाणे, लक्ष्मण वडले, मिरा रेंगे, डॉ. विवेक नावंदर, सिध्दार्थ हत्तीअंबीरे आदी उपस्थित होते.
सत्तेचा दुरुपयोग सुरू - राजेश टोपे
मोदी सरकार आम्ही विकास करतो, असा डंका पेटवला असला तरी सध्या परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्याकडून सत्तेचा सर्रास दुरुपयोग सुरू आहे. देशातील दोन मुख्यमंत्र्यांना ईडी आणि सीबीआयच्या मदतीने जेलमध्ये टाकले.