अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचं परभणीत मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 16:27 IST2019-04-18T16:27:12+5:302019-04-18T16:27:45+5:30
व्यस्त वेळापत्रकातून खास वेळ काढून बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचं परभणीत मतदान
परभणी- मराठीतील आघाडीचा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं आज परभणी येथे येऊन मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी साडे नऊ वाजता काद्राबाद प्लॉट भागातील मतदान केंद्रावर त्यानं मतदान केलं.
संकर्षण कऱ्हाडे हे परभणीचे मूळ रहिवासी असून सध्या मुंबईत स्थायिक आहेत. मराठी टीव्ही मालिकांमध्ये संकर्षण कऱ्हाडे यांच्या भूमिका गाजलेल्या आहेत. सध्या आम्ही सारे खवय्ये आणि कानाला खडा या मालिकांमधून संर्कषण कऱ्हाडे मराठी प्रेक्षकांसमोर येत आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत असल्याने संकर्षण खास मतदान करण्यासाठी परभणीत आला होता.