आर. माधवनचा मुलगा खेलो इंडियामध्ये चमकला, वेदांतने पटकावले पाच सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 05:37 AM2023-02-13T05:37:01+5:302023-02-13T05:37:46+5:30

जलतरणात वेदांतने पटकावली पाच सुवर्णपदके

R. Madhavan's son vedant shines in Khelo India, Vedant wins five golds | आर. माधवनचा मुलगा खेलो इंडियामध्ये चमकला, वेदांतने पटकावले पाच सुवर्ण

आर. माधवनचा मुलगा खेलो इंडियामध्ये चमकला, वेदांतने पटकावले पाच सुवर्ण

googlenewsNext

भोपाळ :  अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत याने खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करताना महाराष्ट्राच्या यशामध्ये मोलाची भूमिका निभावली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकांची लयलूट केलेल्या वेदांतने ५ सुवर्ण आणि २ रौप्य पदके अशी एकूण ७ पदके जिंकताना महाराष्ट्राच्या सांघिक जेतेपदामध्ये सिंहाचा वाटा उचलला. 

आर. माधवननेही ट्वीटरद्वारे आपल्या मुलाच्या यशाचा आनंद व्यक्त केला. 
अभिनेता आर. माधवनने लिहिले की, ‘अपेक्षा फर्नांडिस आणि वेदांत यांची कामगिरी पाहून खूप आनंद झाला. मी शिवराजसिंग चौहान आणि अनुराग ठाकूर यांचे आभार मानतो. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने स्पर्धा आयोजित केली.  आर.माध‌वन याचा मुलगा वेदांत याने या आधीदेखील अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये तो महाराष्ट्र संघाकडून खेळला.

ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न
n खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने एकहाती वर्चस्व राखताना मुलांचे सांघिक जलतरण जेतेपद आणि खेलो इंडिया सर्वांगिण सांघिक जेतेपद पटकावले. १७ वर्षीय वेदांत माधवनने आतापर्यंत अनेक जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. 
n वेदांतने आता भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य बाळगले आहे. 
n २०२१मध्ये अभिनेता आर. माधवन आणि त्याची पत्नी सरिता आपल्या मुलाच्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी दुबईला गेले होते.

n ‘दुसऱ्या ट्वीटमध्ये आर. माधवनने मुलाचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘देवाच्या कृपेने १०० मीटर, २०० मीटर आणि         १,५०० मीटरमध्ये सुवर्ण. ४०० मीटर आणि ८०० मीटरमध्ये रौप्यपदक.’ 

Web Title: R. Madhavan's son vedant shines in Khelo India, Vedant wins five golds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.