कॉर्फबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी हिमांशू मिश्रा, तर महासचिवपदी अबिन थॉमस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 20:36 IST2020-09-14T20:35:42+5:302020-09-14T20:36:22+5:30
आठ कार्यकारी सदस्यांमध्ये महाराष्ट्राचे किशोर बागडे आणि सुदीप मानवटकर यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

कॉर्फबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी हिमांशू मिश्रा, तर महासचिवपदी अबिन थॉमस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कॉर्फबॉल फेडरशन ऑफ इंडियाच्या (केएएफआय) अध्यक्षपदी नवी दिल्ली येथील हिमांशू नाथ मिश्रा तसेच महासचिवपदी केरळचे व्ही. अबिन थॉमस यांची निवड झाली आहे. प. बंगालचे पी. के. पोद्दार हे कोषाध्यक्षपदी निर्वाचित झाले. २०२० ते २०२४ या चार वर्षांसाठी कार्यकारिणी निवडण्यात आली.
गुडगाव येथे १२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या केएफआयच्या आमसभेत नव्या कार्यकारिणीला मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती निर्वाचन अधिकारी सेवानिवृत्त सत्र न्यायाधीश श्रीकांत कुमार नंदा यांनी एका पत्राद्वारे दिली. वरिष्ठ उपाध्यक्षपदी केके वर्मा यांची तर सचिवपदी अशोक कुमार आणि के. सर्वनन यांची निवड झाली आहे. याशिवाय पाच उपाध्यक्ष आणि पाच सह सचिवांचा समावेश करण्यात आला. आठ कार्यकारी सदस्यांमध्ये महाराष्ट्राचे किशोर बागडे आणि सुदीप मानवटकर यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
केएफआयची नवी कार्यकारिणी (सन २०२० ते २०२४)
अध्यक्ष: हिमांशू नाथ मिश्रा, वरिष्ठ उपाध्यक्ष: केके वर्मा, उपाध्यक्ष (५): पी. के. पांडा, बी. आर. सुमन, इंद्रप्रकाश टिक्कीवाल, लालझीरामविया छांगते, श्रीमती सुमन रुपसिंग, महासचिव : व्ही. अबिन थॉमस, सचिव : अशोक कुमार आणि के. सर्वनन, कोषाध्यक्ष : पीयूष कांती पोद्दार, सहसचिव (५) : सुमनुकमार नायक, एल. बी. लक्ष्मीकांत राठोड, आनंद प्रकाश पांडे, रवींद्र कुमार, श्रीमती निधी शेखावत, कार्यकारी सदस्य : हेमंत कुमार, के. स्वामीनाथन, अमित कुमार, प्रदीप कुमार टोपेल, वाय. महेंद्र कपूर, चेतन, किशोर बागडे आणि सुदीप मानवटकर.