Vidhan Sabha 2019: गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढविणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 14:34 IST2019-10-02T14:33:50+5:302019-10-02T14:34:17+5:30

ऐरोली विधानसभा निवडणूक 2019- ऐरोली मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर संदीप नाईक यांच्याऐवजी स्वत: गणेश नाईक निवडणूक लढणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019- Will Ganesh Naik contest from Airoli? | Vidhan Sabha 2019: गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढविणार?

Vidhan Sabha 2019: गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढविणार?

नवी मुंबई: ऐरोली मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर संदीप नाईक यांच्याऐवजी स्वत: गणेश नाईक निवडणूक लढणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांना बेलापूरमधून तिकीट नाकारल्यानंतर बुधवारी राजकीय घडामोडीला वेग आला. पुढील दिशा ठरविण्यासाठी सकाळी नाईक समर्थक नगरसेवकांची महापौर बंगल्यावर बैठक झाली.

या बैठकीला गणेश नाईक यांच्यासह महापौर जयवंत सुतार, माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते. गणेश नाईक यांनी ऐरोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव स्वत: संदीप नाईक व उपस्थित नगरसेवकांनी या बैठकीत मांडला. त्याला सर्वानुमते मंजुरी दिल्याने ऐरोलीमधून संदीप नाईक यांच्याऐवजी गणेश नाईक भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढतील, हे निश्चित झाले आहे.

दरम्यान, यासंदर्भात संदीप नाईक यांच्याकडे विचारणा केली असता, ऐरोली आणि बेलापूरमधून भाजपाचे उमेदवार बहुमताने निवडूण येतील, असे स्पष्ट केले.  तथापी संध्याकाळपर्यंत सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे सूचक विधान करून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019- Will Ganesh Naik contest from Airoli?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.