पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी, TMC ने शेअर केला रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 20:46 IST2024-03-14T20:39:54+5:302024-03-14T20:46:31+5:30

Mamata Banerjee News: पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

West Bengal Chief Minister Mamata Banerjee Injured, TMC Shares Photo of Bleeding Condition | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी, TMC ने शेअर केला रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी, TMC ने शेअर केला रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत यावेळी पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



तृणमूल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांची रक्कबंबाळ अवस्थेतील छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. त्यामुळे घटनेचं गांभीर्य अधिकच वाढलं आहे.  ममता बॅनर्जी ह्या व्यायाम करत असताना ट्रेडमिलवरून घसरून पडल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली अशी माहिती समोर येत आहे. त्यांना त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हे तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

Web Title: West Bengal Chief Minister Mamata Banerjee Injured, TMC Shares Photo of Bleeding Condition