मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या ताफ्यावर उत्तर प्रदेशात दगडफेक, अनेक वाहनांचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 05:57 AM2024-03-31T05:57:49+5:302024-03-31T05:59:06+5:30

StonePelting on the convoy of Sanjeev Balian: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना मोदी सरकारमधील मंत्री संजीव बालियान यांत्या ताफ्यावर उत्तर प्रदेशात हल्ला झाला. (Uttar Pradesh Lok Sabha Election 2024) केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान यांचा ताफा शनिवारी  संध्याकाळी उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमधील मढकरीमपूर येथे प्रचारासाठी आला होता.

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: Stone pelting on the convoy of Narendra Modi government minister Sanjeev Balian in Uttar Pradesh, many vehicles were damaged | मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या ताफ्यावर उत्तर प्रदेशात दगडफेक, अनेक वाहनांचं नुकसान

मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या ताफ्यावर उत्तर प्रदेशात दगडफेक, अनेक वाहनांचं नुकसान

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना मोदी सरकारमधील मंत्री संजीव बालियान यांत्या ताफ्यावर उत्तर प्रदेशात हल्ला झाला. केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान यांचा ताफा शनिवारी  संध्याकाळी उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमधील मढकरीमपूर येथे प्रचारासाठी आला होता. त्यावेळी गावातील काही तरुणांनी या ताफ्यावर दगडफेक केली. या दगडफेकीमुळे अनेक वाहनांचं नुकसान झालं आहे. तसेच काही कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.

येथे भाजपाच्या उमेदवारांच्या स्वागतासाठी सरपंचांच्या घरी कार्यक्रम होत होता. त्याचवेळी काही कुरापतखोर मंडळींनी दगडफेक केली. केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे नेते संजीव बालियान हे मुझफ्फरनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आहेत. शनिवारी खतौली येथे त्यांच्या निवडणूक कार्यालयाचं  उद्घाटन होतं. मात्र त्यामध्ये हे उपस्थिर राहू शकले नाहीत.

गावचे सरपंच राकेश कुमार यांच्या मढकरीमपूर येथे त्यांच्या घरी स्वागताचा कार्यक्रम सुरू होता. संजीव बालियान यांता ताफा पोहोचल्यानंतर त्यांचं स्वागत झालं. त्यावेळी माजी आमदार विक्रम सैनी हे भाषण करत होते. त्याचवेळी रस्त्याच्या शेजारी असलेल्या तरुणांनी घोषणाबाजी करत दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीमुळे मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसेच परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या दगडफेकीमध्ये सुमारे १० कार्यकर्ते जखमी झाले. तर १५ हून अधिक वाहनांचं नुकसान झालं आहे. या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या बालियान यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करणाऱ्या तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शेतांमध्ये उड्या मारून फरार झाले.

या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच ग्रामस्थ आणि समर्थकांनी संजय बालियान यांच्या ताफ्याला गावाबाहेर सुरक्षितरीत्या नेले. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना घडली तेव्हा संजीव बालियान सरपंचांच्या निवासस्थानी होते.  

Web Title: Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: Stone pelting on the convoy of Narendra Modi government minister Sanjeev Balian in Uttar Pradesh, many vehicles were damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.