Uttar Pradesh Assembly Election 2022: मथुरेत भाजपला 'दे धक्का', कट्टर RSS नेत्याचा भाजपला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 09:19 PM2022-01-18T21:19:18+5:302022-01-18T21:22:07+5:30

भाजपात कुठलिही विचारधारा राहिली नसून प्रामाणिकपणा कोसो दूर गेला आहे. त्यामुळे, आपण भाजप सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पुढील राजकीय रणनितीसंदर्भात 19 जानेवारी रोजी आपण जाहीरपणे बोलू, असेही शर्मा यांनी म्हटले.

Uttar Pradesh Assembly Election 2022: BJP's 'push' in Mathura, hardline RSS leader S.K.sharama bids farewell to BJP | Uttar Pradesh Assembly Election 2022: मथुरेत भाजपला 'दे धक्का', कट्टर RSS नेत्याचा भाजपला रामराम

Uttar Pradesh Assembly Election 2022: मथुरेत भाजपला 'दे धक्का', कट्टर RSS नेत्याचा भाजपला रामराम

Next

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये तिकीट वाटपाला सुरूवात झाल्यानंतर राजी-नाराजी समोर येत आहे. ज्या नेत्यांचा तिकीट वाटपात अपेक्षाभंग झालाय, ते नेते पक्षासोबत बंडखोरी करत आहेत. मुथरा जिल्ह्यात भाजपला असाच एका नेत्याचा फटका बसला आहे. मांट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार न मिळाल्याने एस.के. शर्मा यांनी मंगळवारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भाजपात केवळ राम नावाने लूट होत असल्याचा आरोपही शर्मा यांनी केला आहे. 

भाजपात कुठलिही विचारधारा राहिली नसून प्रामाणिकपणा कोसो दूर गेला आहे. त्यामुळे, आपण भाजप सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पुढील राजकीय रणनितीसंदर्भात 19 जानेवारी रोजी आपण जाहीरपणे बोलू, असेही शर्मा यांनी म्हटले. भाजपमुळे माझे कोट्यवधी रुपये खर्ची झाले आहेत. 2009 ते 2019 पर्यंतच्या अनेक निवडणुकांवेळी भाजपने माझ्यासोबत विश्वासघात केला आहे. पक्षासाठी मी निष्ठेनं काम केलं, पक्षाच्या संघटनासाठी जेव्हाही निधी मागण्यात आला, मी निधी दिला. मात्र, पक्षाने मला धोका दिल्याचं शर्मा यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. 

सन 1980 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत ते जोडले आहेत. भाजपला मजबूत करण्यासाठी त्यांनी आपलं राजकीय आयुष्य खर्ची केलं. तन-मन-धन स्वाहा झालं, यंदाच्या निवडणुकीत सव्वा लाख मतं घेण्याचं लक्ष्य त्यांनी ठेवलं होतं. गेल्या 5 वर्षांत असं कुठलंही गाव, शहर, परिसर नाही, जेथे मी माझं संघटन मजबूत केलं नाही, असेही ते म्हणाले. मांटमध्ये माझा कमीपणा करण्यासाठीच केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या फंडातून 5 कोटी रुपये खर्च केले. 

दरम्यान, भाजपने युवा नेतृत्व राजेश चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. सन 1987 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेल्या राजेश चौधरी यांनी विद्यार्थी दशेतूनच राजकारणात प्रवेश केला आहे. सन 1992 ते 1998 पर्यंत एबीव्हीपीच्या महत्त्वाच्या पदावर त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. सध्या ते युपीत भाजपाचे प्रवक्ता आहेत.    
 

 

Web Title: Uttar Pradesh Assembly Election 2022: BJP's 'push' in Mathura, hardline RSS leader S.K.sharama bids farewell to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app