बेळगावजवळ प्रशिक्षण विमान कोसळले, प्रशिक्षणार्थी पायलट किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 12:23 PM2023-05-30T12:23:09+5:302023-05-30T12:39:31+5:30

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Training plane crashes near Belgaum, trainee pilot slightly injured | बेळगावजवळ प्रशिक्षण विमान कोसळले, प्रशिक्षणार्थी पायलट किरकोळ जखमी

बेळगावजवळ प्रशिक्षण विमान कोसळले, प्रशिक्षणार्थी पायलट किरकोळ जखमी

googlenewsNext

प्रकाश बेळगोजी

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील होन्नीहाळ ते बागेवाडी रोड दरम्यानच्या शेतात प्रशिक्षण विमान कोसळले. या दुर्घटनेत पायलटसह इतर जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बेळगाव विमानतळावरून सांबरा गावाजवळ प्रशिक्षण घेत असलेल्या छोट्या विमानाचे मोदगा- बागेवाडी रस्त्याच्या मध्यभागी होन्नीहाळ या गावच्या हद्दीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेत प्रशिक्षकाच्या पायाला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच मारीहाळ स्टेशन पोलिस आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. 

याबाबत माहिती अशी की, बेळगाव विमानतळावर सुरू करण्यात आलेल्या रेडबर्ड वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या एका विमानाने आज, मंगळवारी सकाळी प्रशिक्षणासाठी हवाई उड्डाण केले होते. त्यानंतर सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास सांबरा गावाजवळ अवकाशात या विमानामध्ये बिघाड झाल्यामुळे मोदगा -बागेवाडी रस्त्याच्या मध्यभागी होन्निहाळ तालुक्याच्या हद्दीत विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. लँडिंग सुरळीत न झाल्याने विमान शेतात कोसळले.

चाके तुटून विमानाचा अपघात झाला आणि या घटनेत प्रशिक्षकाच्या पायाला दुखापत झाली. सदर अपघाताची माहिती मिळताच मारीहाळ पोलिसांसह सांबरा हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर इजा अथवा जीवितहानी झाली नाही.

Web Title: Training plane crashes near Belgaum, trainee pilot slightly injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.