निवडणुकीत कोण जिंकणार? पोपटानं सांगितलं भविष्य, मग मालकाला पोलिसांनी नेलं पकडून, कारण काय, वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 13:53 IST2024-04-10T13:52:48+5:302024-04-10T13:53:30+5:30
Tamil Nadu Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या निवडणुकीसाठी यावेळी तामिळनाडूमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. त्यात आता तामिळनाडूमधील कुड्डालोर मतदारसंघामधून एक अजब बातमी समोर आली आहे.

निवडणुकीत कोण जिंकणार? पोपटानं सांगितलं भविष्य, मग मालकाला पोलिसांनी नेलं पकडून, कारण काय, वाचा...
लोकसभेच्या निवडणुकीसाठी यावेळी तामिळनाडूमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. त्यात आता तामिळनाडूमधील कुड्डालोर मतदारसंघामधून एक अजब बातमी समोर आली आहे. येथे लोकांचं भविष्य सांगणाऱ्या पोपटाने येथून निवडणूक लढवत असलेल्या पीएमकेच्या उमेदवाराच्या विजयाची भविष्यवाणी केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी या पोपटाला आणि त्याच्या मालकाला काही काळासाठी ताब्यात घेतले. त्यानंतर पोपटाला पिंजऱ्यात बंद न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार दक्षिणेतील चित्रपद दिग्दर्शक थंकर बचन पीएमकेच्या तिकिटावर कुड्डालोर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते रविवारी मतदारसंघाच फिरत होते. त्यावेळी ते एका प्रसिद्ध मंदिराजवळ थांबले. तिथे एक ज्योतिषी पिंजऱ्यात बंद असलेल्या पोपटाच्या माध्यमातून भविष्य सांगत होता. थंकर बचन हे आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी पोपटाजवळ पोहोचलले. तिथे त्यांचे समर्थकही उपस्थित होते.
हा पोपट पिंजऱ्यात बंद होता. त्याला बाहेर काढून त्याच्यासमोर काही चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यातील एक चिठ्ठी पोपटाने काढली. त्या चिठ्ठीमध्ये मंदिरातील मुख्य देवतेचा फोटो होता. त्यावरून थंकर बचन यांना अवश्य यश मिळेल, असे मंदिरातील पुजाऱ्याने सांगितले.
भविष्यवाणीवर खुश होऊन पीएमकेचे उमेदवार थंकर बचन यांनी पोपटाला खाऊ दिले. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर या पोपटाचा मालक असलेला ज्योतिषी सेल्वराज आणि त्याच्या भावाला पोलिसांनी काही काळासाठी ताब्यात घेतले. त्यानंतर पोपटाला पिंजऱ्यात बंद करून ठेवल्यावरून वन खात्याने त्यांना ताकिद दिली. तसेच पोपटांची सुटका केली. या कारवाईनंतर पीएमकेच्या नेत्यांनी डीएमके सरकरावर टीका केली आहे. आपल्या परभवाचं भविष्यही ऐकणं डीएमकेच्या नेत्यांना सहन झालं नाही, असा टोला पीएमकेचे अध्यक्ष अंबुमणी रामदास यांनी लगावला.