तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 10:04 IST2025-08-10T10:01:14+5:302025-08-10T10:04:51+5:30

सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह या दोघांच्या क्रूर कृत्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता.

Sonam Raghuvanshi's grandmother passes away in jail; Shocked by granddaughter's brutal act | तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

मेघालयमध्ये झालेल्या राजा रघुवंशी हत्येमुळे अवघा देश हादरला होता. या प्रकरणात राजा रघुवंशी याची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाह यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी मिळून कट रचला आणि राजा रघुवंशी याची हत्या केल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान आता या दोघांच्या क्रूर कृत्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. यातच आता या धक्क्यामुळे सोनम रघुवंशी हिच्या आजीचा मृत्यू झाला आहे. नातीच्या कृत्यामुळे आजीला मोठा धक्का बसला होता. 

काहीच दिवसांपूर्वी राजा रघुवंशी याच्या हत्येत सोनमची साथ देणारा राज कुशवाहा याच्या आजीचे देखील निधन झाले होते. मात्र, या सगळ्यात दोघांनाही आपल्या कुटुंबाची भेट घेता आलेली नाही. या दारम्यानच आता सोनम रघुवंशी हिची आजी गंगोटी बाई यांनी देखील शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. गंगोटी बाईंच्या निधनानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. 

सोनम-राजचा जामीन अर्ज फेटाळला!
काही दिवसांपूर्वी सोनमच्या वकिलांनी तिच्या आणि तिच्या प्रियकर राजसाठी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, परंतु न्यायालयाने दोघांचेही जामीन अर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे अजूनही दोघे तुरुंगात कैद आहेत. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात इंदूरच्या शिलम जेम्स आणि ग्वाल्हेरमधील दोघांना जामीन मिळाला आहे.

Web Title: Sonam Raghuvanshi's grandmother passes away in jail; Shocked by granddaughter's brutal act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.