काैटुंबिक वारसा पुढे चालवण्यासाठी नेत्यांचे नातेवाईक मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 06:49 AM2024-04-08T06:49:55+5:302024-04-08T06:50:34+5:30

या राज्यात ‘फॅमिली फॅक्टर’चा बोलबाला

Relatives of leaders in the field to carry forward the Kaitumba legacy | काैटुंबिक वारसा पुढे चालवण्यासाठी नेत्यांचे नातेवाईक मैदानात

काैटुंबिक वारसा पुढे चालवण्यासाठी नेत्यांचे नातेवाईक मैदानात

मनोज भिवगडे

रांची : झारखंडच्या राजकीय क्षेत्रात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने परिवारवाद उफाळून आला आहे. ‘फॅमिली फॅक्टर’च्या मुद्याने झारखंडचे राजकीय क्षेत्र ढवळून निघत असून, सोरेन कुटुंबासह सर्वच राजकीय पक्षांतील प्रमुख नेत्यांचे वारसदार कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन यांचे कुटुंब वारसा हक्क चालविण्यात आघाडीवर आहे. दुमका लोकसभा मतदासंघातून आठ वेळा खासदार राहिल्याने सोरेने यांच्या कुटुंबाने या मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. येथून त्यांची मोठी सून सीता सोरेन भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांचा सामना काका व झामुमोचे नलिन सोरेन यांच्यासोबत होणार आहे. 

यांनीही चालविला वारसा, कुठे जावई तर कुठे सासरे रिंगणात

काँग्रेस व झारखंड विकास मोर्चाचे नेते ब्रजकिशोर जयसवाल यांचा मुलगा मनीष जयसवाल हजारीबाग येथून काँग्रेसचे 
उमेदवार आहेत.
हजारीबाग येथून काँग्रेसचे उमेदवार असलेले जयप्रकाश पटेल हे मांडू येथून पाच वेळा आमदार व गिरीडीह येथून खासदार राहिलेले टेकलाल मेहता यांचा मुलगा आहे. जयप्रकाश पटेल यांचे सासरे मथुरा महतो हे गिरीडीह 
येथून झामुमोचे उमेदवार आहेत. 
एकीकडे जावई काँग्रेसकडून, तर सासरे 
झामुमोकडून शेजारी मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.
सिंहभूमी येथून माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या पत्नी गीता या भाजपच्या 

उमेदवार आहेत.
nकाँग्रेसने खुंटी लोकसभा मतदारसंघात कालिचरण मुंडा यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते स्व. टी. मुचिराय मुंडा यांचे ते पुत्र आहेत.
nझामुमोने विद्यमान खा. विजय हांसदा यांना राजमहल येथून पुन्हा रिंगणात उतरविले आहे. ते वडील थाॅमस हांसदा यांचा वारसा पुढे चालवीत आहेत.
nकेंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी या पती रमेश यादव यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे चालवीत आहेत. भाजपने त्यांना कोडरमा येथून प्रथम २०१९ मध्ये उमेदवारी दिली होती.

‘सत्ताधारी जेल में, अटके हैं बेल में’
nहेमंत सोरेन यांच्यावर झालेली ईडीची कारवाई व त्यांची कारागृहात झालेली रवानगी सध्या प्रचाराचा मुद्दा झाला आहे.
nपरिवारवादासोबतच सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर प्रहार करीत विरोधी पक्षांनी ‘सत्ताधारी जेल में, अटके हैं बेल में’ दिलेला हा नारा चांगलाच गाजतो आहे.

Web Title: Relatives of leaders in the field to carry forward the Kaitumba legacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.