राहुल गांधी वायनाडची जागाही सोडण्याच्या तयारीत, लोकसभा निवडणूक कुठून लढणार? समोर येतेय अशी माहिती   

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:40 AM2024-02-27T10:40:58+5:302024-02-27T10:41:37+5:30

Rahul Gandhi News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पारंपरिक अमेठी मतदारसंघासह केरळमधील वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता राहुल गांधी हे वायनाडचा मतदारसंघही सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

Rahul Gandhi is preparing to leave the seat of Wayanad, from where will he contest the Lok Sabha elections? The information is coming up | राहुल गांधी वायनाडची जागाही सोडण्याच्या तयारीत, लोकसभा निवडणूक कुठून लढणार? समोर येतेय अशी माहिती   

राहुल गांधी वायनाडची जागाही सोडण्याच्या तयारीत, लोकसभा निवडणूक कुठून लढणार? समोर येतेय अशी माहिती   

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पारंपरिक अमेठी मतदारसंघासह केरळमधील वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अमेठीमध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना पराभूत केले होते. तर वायनाड येथून राहुल गांधी विजयी झाले होते. मात्र आता राहुल गांधी हे वायनाडचा मतदारसंघही सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी हे कर्नाटक किंवा तेलंगाणामधील एका आणि उत्तर प्रदेशमधील एका मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. 

केरळमध्ये जागावाटपाबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ही माहिती समोर आली आहे. येथे इंडियन यूनियन मुस्लिम लीग (आययूएमएल)कडून काँग्रेसवर २ ऐवजी ३ जागा देण्यासाठी दबाव आणण्यात येत आहे. वायनाडमधील बहुतांश मतदार हे मुस्लिम असल्याने आययूएमएल वायनाड येथून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. 

त्याबरोबरच भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय)ने  पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांच्या पत्नी एनी राजा यांना वायनाड येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. अशा परिस्थितीत एका प्रमुख नेत्याची पत्नी राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक लढवत असेल, तर इंडिया आघाडीसाठी हे चित्र चांगले दिसले नसते. 

याबाबत डी. राजा म्हणाले होते की, केरळमधील एलडीएफ आघाडीमधून सीपीआयला ज्या चार जागा मिळाल्या त्यापैकी वायनाड एक आहे.  पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये वायनाडची सोडण्याबाबत काँग्रेसची समजूत घालण्यासाठी कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नव्हती, असेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात सीपीआयच्या पी.पी. सुनीर यांचा ४ लाखांहून अधिक मतांनी पराभव करून लोकसभा गाठली होती.  

Web Title: Rahul Gandhi is preparing to leave the seat of Wayanad, from where will he contest the Lok Sabha elections? The information is coming up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.