पंजाबमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट! परिसरात खळबळ, पोलिसांकडून हायअलर्ट जारी, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 19:10 IST2026-04-01T19:02:47+5:302026-04-01T19:10:25+5:30

Major Explosion Near BJP Office in Punjab: पंजाब आणि हरियाणाची राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये बुधवारी सायंकाळी एका भीषण स्फोटाने खळबळ उडाली.

Punjab News: Major Explosion Near BJP Office in Chandigarh; No Casualties Reported, Forensic Teams at Spot | पंजाबमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट! परिसरात खळबळ, पोलिसांकडून हायअलर्ट जारी, नेमकं काय घडलं?

पंजाबमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट! परिसरात खळबळ, पोलिसांकडून हायअलर्ट जारी, नेमकं काय घडलं?

पंजाब आणि हरियाणाची राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये बुधवारी सायंकाळी एका भीषण स्फोटाने खळबळ उडाली. सेक्टर ३७ मधील भाजपच्या पंजाब प्रदेश मुख्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका स्कूटरचा अचानक स्फोट झाला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. परंतु, स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की त्याचा आवाज दूरवर ऐकू आला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. स्फोट झालेल्या स्कूटरची ओळख अद्याप पटलेली नाही. भाजप कार्यालयाच्या इमारतीचे कोणतेही अंतर्गत नुकसान झालेले नाही. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत असून लवकरच आरोपींचा शोध घेऊ, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नेमकी घटना काय?

बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सेक्टर ३७ मधील भाजप कार्यालयाबाहेर पार्क केलेल्या एका स्कूटरमध्ये अचानक स्फोट झाला. स्फोट होताच परिसरात घबराट पसरली आणि नागरिकांची धावपळ सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच चंदीगडचे एसएसपी आणि आयजी पुष्पेंद्र कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. तपासासाठी खालील पथके तैनात करण्यात आली आहेत. फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून स्फोटकांचे नमुने गोळा करत आहे. तसेच परिसरातील इतर संशयास्पद वस्तूंचा शोध घेतला जात आहे. शिवाय, खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दल घटनास्थळी तैनात आहेत.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

या घटनेनंतर संपूर्ण चंदीगड शहरात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा आणि महत्त्वाच्या शासकीय इमारतींबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तातडीने नियंत्रण कक्षाला कळवावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.

Web Title : पंजाब में भाजपा कार्यालय के बाहर धमाका, हाई अलर्ट जारी।

Web Summary : चंडीगढ़ में भाजपा कार्यालय के बाहर एक स्कूटर में विस्फोट से दहशत फैल गई। कोई हताहत नहीं हुआ, लेकिन पुलिस ने जांच शुरू कर दी है, इलाके को सील कर दिया है और फोरेंसिक सबूत जुटाए जा रहे हैं। चंडीगढ़ में हाई अलर्ट जारी, सार्वजनिक स्थानों पर सुरक्षा बढ़ाई गई।

Web Title : Blast outside BJP office in Punjab, high alert declared.

Web Summary : A scooter exploded outside the BJP office in Chandigarh, causing panic. No casualties were reported, but police have launched an investigation, sealing the area and collecting forensic evidence. A high alert has been issued across Chandigarh, with increased security measures at public places.