Pawan Singh : "आईला दिलेलं वचन..."; पवन सिंह यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 02:19 PM2024-03-13T14:19:57+5:302024-03-13T14:30:36+5:30

Pawan Singh : भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Pawan Singh says he will contest lok sabha election 2024 | Pawan Singh : "आईला दिलेलं वचन..."; पवन सिंह यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात केली मोठी घोषणा

Pawan Singh : "आईला दिलेलं वचन..."; पवन सिंह यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात केली मोठी घोषणा

भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पवन सिंह यांनी बुधवारी (13 मार्च) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देत याबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

"मी आपला समाज, जनता जनार्दन आणि आईला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढवणार आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्य अपेक्षित आहे. जय माता दी" पवन सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

भाजपाने आसनसोलमधून दिलं तिकीट 

भाजपाने 2 मार्च रोजी पवन सिंह यांना तिकीट देण्याची घोषणा केली होती. पक्षाने त्यांना पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात चर्चा झाल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली. यासोबतच त्यांनी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. मात्र त्यांनी उमेदवारी का मागे घेतली? याचा खुलासा केला नाही.

पवन सिंह 3 मार्च रोजी म्हणाले होते की, "मी भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे मनापासून आभार व्यक्त करतो. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला आसनसोलमधून उमेदवार म्हणून घोषित केले पण काही कारणास्तव मी आसनसोलमधून निवडणूक लढवू शकणार नाही.''
 

Web Title: Pawan Singh says he will contest lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.