एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:38 IST2025-06-28T20:37:05+5:302025-06-28T20:38:15+5:30

दिनेशने विमानात बसताच दारू पिण्यास सुरुवात केली. जेव्हा एअर होस्टेसने त्याला मद्यपान करण्यापासून रोखले, तेव्हा तो संतापला अन्...

Passenger misbehaves with female crew member after consuming alcohol on Dubai–Jaipur Air India flight | एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!

एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!

दुबईहून जयपूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या आंतरराष्ट्रीय विमानात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या विमानात एका एअर होस्टेससोबत विनयभंग आणि गैरवर्तनाचा प्रकार घडला आहे. ही घटना शनिवारी रात्री ३ वाजता जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या फ्लाइट क्रमांक 'आयएक्स १९५'मध्ये घडली. विमान उतरताच, आरोपी प्रवाशाला सीआयएसएफने ताब्यात घेतले आणि नंतर विमानतळ पोलिसांकडे सोपवले.

विमानातच दारू पिण्यास सुरुवात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचे नाव दिनेश असे आहे. तो विमानात १५ बी क्रमांकाच्या सीटवर बसला होता. दिनेशने विमानात बसताच दारू पिण्यास सुरुवात केली. जेव्हा एअर होस्टेसने त्याला मद्यपान करण्यापासून रोखले, तेव्हा तो संतापला. त्याने केवळ वादच घातला नाही, तर एअर होस्टेसशी गैरवर्तनही केले.

तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी तरुणाने एअर होस्टेसला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि तिला त्रास देत राहिला. जेव्हा इतर क्रू मेंबर्सनी मध्ये पडून आरोपीला असे करण्यापासून रोखले, तेव्हा तो त्यांच्याशीही भांडू लागला.

पोलिसांत गुन्हा दाखल
परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून, क्रूने लगेच विमानाच्या पायलटला याची माहिती दिली. विमान जयपूरला पोहोचताच, सर्व माहिती सीआयएसएफला देण्यात आली. विमान उतरताच सीआयएसएफने आरोपी दिनेशला ताब्यात घेतले आणि चौकशीनंतर त्याला विमानतळ पोलिसांकडे सोपवले. एअर होस्टेसच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

एअर होस्टेसने तिच्या जबाबात म्हटले की, आरोपी तरुण तिच्याशी सतत गैरवर्तन करत होता. तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, तो आणखीनच संतापला. त्याच्या या कृत्यांमुळे विमानात उपस्थित इतर प्रवासी आणि क्रू मेंबर्सनाही त्रास झाला. पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

Web Title: Passenger misbehaves with female crew member after consuming alcohol on Dubai–Jaipur Air India flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.