अवघ्या ३० दिवसांचा वेळ; सोफिया पोहोचल्या संसदेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 06:21 IST2024-06-10T06:21:33+5:302024-06-10T06:21:58+5:30
Odisha Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीला अवघे ३० दिवस शिल्लक असताना काँग्रेसने तिकीट दिले आणि ३२ वर्षीय सोफिया फिरदौस यांनी भाजपच्या उमेदवार चंद्रा महापात्रा यांचा ८ हजार मतांनी पराभव केला. महिन्याभराच्या तयारीत लोकसभेत गेलेल्या सोफिया या ओडिशातील पहिल्या मुस्लीम खासदार ठरल्या आहेत.

अवघ्या ३० दिवसांचा वेळ; सोफिया पोहोचल्या संसदेत
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीला अवघे ३० दिवस शिल्लक असताना काँग्रेसने तिकीट दिले आणि ३२ वर्षीय सोफिया फिरदौस यांनी भाजपच्या उमेदवार चंद्रा महापात्रा यांचा ८ हजार मतांनी पराभव केला. महिन्याभराच्या तयारीत लोकसभेत गेलेल्या सोफिया या ओडिशातील पहिल्या मुस्लीम खासदार ठरल्या आहेत. यापूर्वी ओडिशा विधानसभेत नेतृत्व केलेल्या सोफिया फिरदौस या आता ओडिशातील पहिल्या महिला खासदार झाल्या आहेत. याविषयी त्या म्हणाल्या, सर्वप्रथम मी भारतीय, ओडियन आणि महिला आहे. महिलांचे सक्षमीकरण हेच माझे ध्येय आहे.