मतदानातही ‘नारीशक्ती’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 09:23 IST2024-12-27T09:23:18+5:302024-12-27T09:23:25+5:30

लोकसभा निवडणुकीत पुरुषांपेक्षा अधिक महिलांनी बजावला मतदानाचा हक्क

More women than men exercised their right to vote in the Lok Sabha elections | मतदानातही ‘नारीशक्ती’!

मतदानातही ‘नारीशक्ती’!

नवी दिल्ली : या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली असून या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलेल्या ६४.६४ कोटी लोकांत पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. महिला मतदारांचे हे प्रमाण ६५.७८ टक्के एवढे आहे. तर तुलनेत ६५.५५ टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले आहे.

या निवडणुकीत निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवारांची संख्या ८०० हाेती. २०१९ मध्ये झालेल्या लाेकसभा निवडणुकीत ७२६ महिलांनी निवडणूक लढवली हाेती.

जनतेत विश्वास निर्माण व्हावा म्हणून... : निवडणूक आयोगाने ही आकडेवारी जाहीर करताना म्हटले आहे की, स्वत:हून दखल घेत ही आकडेवारी जाहीर करण्यामागे मतदारांत लाेकशाही आणि निवडणूक प्रक्रियेबद्दल विश्वास निर्माण करणे हा उद्देश आहे. जनतेचा विश्वास हाच भारतीय लोकशाही प्रणालीचा मुख्य आधार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

निवडणुकीचे आकडे काय बोलतात?

नोंदणीकृत मतदार    ९७.९७ कोटी (२०१९ च्या तुलनेत ७.४३% वाढ)
एकूण मतदान     ६४.६४ कोटी (ईव्हीएम: ६४.२१ कोटी, टपाल : ४३ लाख)
पुरुषांचे मतदान    ६५.५५% (३२.९३ कोटी मतदार)
महिलांचे मतदान    ६५.७८% (३१.२७ कोटी मतदार)
तृतीयपंथीय मतदान    १३,००० मतदार 
महिला उमेदवार    ८०० (२०१९ मध्ये ७२६)
महिला उमेदवार नसलेले     १५२ मतदारसंघ
सर्वाधिक मतदान     धुब्री, आसाम - ९२.३%
सर्वात कमी मतदान     श्रीनगर, जम्मू-काश्मीर - ३८.७%
एकूण मतदान केंद्रे    १०.५२ लाख
५०% पेक्षा कमी मतदान     ११

...म्हणून आकडेवारीला आहे विशेष महत्त्व

लाेकसभा निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीवरून राजकीय पक्षांनी आरोप-प्रत्यारोप केले. या आकडेवारीत बनाव केल्याचा आरोप अनेकदा झाला.

या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ही आकडेवारी अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा व सिक्कीम या राज्यांशीही संबंधित आहे.

फेरमतदान खूप कमी

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत ५४० मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले होते.

यंदाच्या निवडणुकीत १०.५२ लाख मतदान केंद्रांपैकी फक्त ४० केंद्रांवर म्हणजे फक्त ०.००३८ टक्के केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे.

Web Title: More women than men exercised their right to vote in the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.