मनमोहन सिंग, अडवाणी यांचे घरून मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 10:32 IST2024-05-19T10:31:52+5:302024-05-19T10:32:17+5:30
नवी दिल्लीतील एका निवडणूक अधिकाऱ्याने ही माहिती दिली. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गुरुवारी वृद्ध मतदार, दिव्यांग व्यक्तींसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा सुरू केली. ही सुविधा २४ मेपर्यंत उपलब्ध असेल.

मनमोहन सिंग, अडवाणी यांचे घरून मतदान
नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती मोहंमद हामिद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी घरून मतदानाच्या (गृहमतदान) सुविधेचा लाभ घेत आज मतदानाचा हक्क बजावला.
नवी दिल्लीतील एका निवडणूक अधिकाऱ्याने ही माहिती दिली. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गुरुवारी वृद्ध मतदार, दिव्यांग व्यक्तींसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा सुरू केली. ही सुविधा २४ मेपर्यंत उपलब्ध असेल. शुक्रवारी दिल्लीच्या सातही लोकसभा मतदारसंघांत १४०९ जणांनी घरून मतदान केले. दुसऱ्या दिवसापर्यंत एकूण २९५६ मतदारांनी घरबसल्या मतदान केले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात घरबसल्या मतदान सुविधेचा लाभ घेत १७ मे रोजी घरून मतदान केले. मोहम्मद हमीद अन्सारी यांनी गुरुवारी, तर लालकृष्ण अडवाणी यांनी शनिवारी मतदान केले, असे सूत्रांनी सांगितले.