इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:59 IST2025-07-03T12:49:30+5:302025-07-03T12:59:24+5:30
राजा रघुवंशी प्रकरणात आता त्याची बहीण सृष्टी हिच्या विरोधात आसाम पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
राजा रघुवंशी प्रकरणात आता त्याची बहीण सृष्टी हिच्या विरोधात आसाम पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सृष्टी रघुवंशी हिने राजाच्या हत्येनंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या होत्या. यातील काही पोस्ट या आक्षेपार्ह असल्याचे म्हणत आता आसाम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आसाममध्ये आपल्या भावाचा नरबळी दिला गेला असल्याचा दावा सृष्टीने केला होता. सोनम तंत्र मंत्र करण्यासाठीच राजाला गुवाहाटीला घेऊन गेली होती, असे देखील सृष्टी म्हणाली.
नेमकं झालं काय?
या प्रकरणी आता आसाम पोलिसांनी सृष्टी रघुवंशी हिला एक नोटिस पाठवली आहे. या नोटिसमध्ये असे म्हटले आहे की, 'सध्या सुरू असलेल्या तपासात तुमची चौकशी करण्यासाठी आमच्याकडे काही गोष्टी आहेत.' स्वतःची बाजू मांडण्यासाठी सृष्टीला गुवाहाटीला बोलावण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस तपासादरम्यान लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल सृष्टीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सृष्टीने मागितली माफी!
सृष्टी रघुवंशी हिने केलेली पोस्ट ही प्रादेशिक आणि भाषिक वाद असल्याचे मानले जात आहे. मात्र, राजाचा मृतदेह सापडल्यानंतर आणि सोनमचं सत्य समोर आल्यानंतर सृष्टीने सोशल मीडियावर लोकांची माफी मागितली होती. परंतु, पोलिसांनी तिच्यावर धार्मिक भवन भडकवल्याचा आणि प्रादेशिक भाषिक वादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. राजाचा भाऊ विपिन यानेदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सोनमच्या भावाची नार्को टेस्ट करा!
एकीकडे पोलीस तपास सुरू असताना आता सोनमचा भाऊ गोविंद देखील रघुवंशी कुटुंबाच्या निशाण्यावर आला आहे. राजाचा भाऊ विपिन याने गोविंद याची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी केली आहे. हा काहीतरी वेगळाच प्रकार असून, सोनम आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी राजाचा भाऊ सर्वोच्च न्यायालयात करणार आहे.