कमी मतदानाचा फटका कुणाला, फायदा कोणाचा?; हिंदी भाषिक राज्यात ५.७ टक्के मतदान घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 09:34 AM2024-04-26T09:34:44+5:302024-04-26T09:35:15+5:30

२०१९च्या तुलनेत यंदाच्या लोकसभेत १०२ जागांसाठी झालेल्या मतदानात ४ टक्के घट

Loksabha Election 2024 - Who is affected by low turnout, who benefits?; Voter turnout in Hindi-speaking states fell by 5.7 percent | कमी मतदानाचा फटका कुणाला, फायदा कोणाचा?; हिंदी भाषिक राज्यात ५.७ टक्के मतदान घटले

कमी मतदानाचा फटका कुणाला, फायदा कोणाचा?; हिंदी भाषिक राज्यात ५.७ टक्के मतदान घटले

नवी दिल्ली : २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात १०२ जागांसाठी झालेल्या मतदानात ४ टक्के घट झाली आहे. या घटलेल्या मतदानाचा फटका कुणाला आणि फायदा कुणाचा याबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत. 

हिंदी भाषिक राज्यांमध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा ५.७ टक्के कमी मतदान झाले. लोकसभेच्या १०२ जागांमध्ये ६ टक्के कमी मतदान झाले. त्यानंतर मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोग कामाला लागला आहे. शिवाय भाजपनेही मतदान वाढवण्यासाठी आपल्या रणनीतीत बदल केला आहे. 

आकडेवारी काय सांगते?
हिंदी भाषिक पट्ट्यातही गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ५.७ टक्के कमी मतदान. 
भाजप व घटक पक्षांचे उमेदवार असलेल्या जागांवर २०१९च्या तुलनेत जवळपास ५.३२ टक्के कमी मतदान झाले आहे. 
इंडिया आघाडीचे उमेदवार असलेल्या ठिकाणी मतदानाचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत २.५१ टक्के घटले आहे. 

याचा अर्थ काय? ६ टक्के मतदान कमी होणे म्हणजे जवळपास ७३ हजार ते ९० हजार लोकांनी मतदान केलेले नाही. एवढा मोठा फरक निवडणुकीत जय किंवा पराजयासाठी कारणीभूत ठरू शकतो. २०१९ मध्ये भाजपने ५७ जागांवर ७५ हजार पेक्षा कमी मतांच्या फरकाने विजय मिळविला होता. 

Web Title: Loksabha Election 2024 - Who is affected by low turnout, who benefits?; Voter turnout in Hindi-speaking states fell by 5.7 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.