प्रल्हाद जोशी यांच्यावर लिंगायत समाज नाराज; धारवाडमध्ये भाजपाला फटका बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 09:12 AM2024-04-25T09:12:47+5:302024-04-25T09:13:31+5:30

प्रल्हाद जोशी दोन दशके धारवाडचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. शिरहट्टी फकीरेश्वर मठाचे प्रमुख दिंगलेश्वर महास्वामी यांनी लढण्याचा निर्णय घेतला होता

Loksabha Election 2024 - Lingayat community upset over Prahlad Joshi; Will BJP get hit in Dharwad? | प्रल्हाद जोशी यांच्यावर लिंगायत समाज नाराज; धारवाडमध्ये भाजपाला फटका बसणार?

प्रल्हाद जोशी यांच्यावर लिंगायत समाज नाराज; धारवाडमध्ये भाजपाला फटका बसणार?

डॉ. वसंत भोसले

धारवाड : सलग चारवेळा निवडून येणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर लिंगायत समाजाने जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. दरम्यान, काँग्रेसने युवानेता विनोद आसुती यांना दिलेल्या उमेदवारीने भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला आव्हानच नाही असे मानले जात आहे.

प्रल्हाद जोशी दोन दशके धारवाडचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. शिरहट्टी फकीरेश्वर मठाचे प्रमुख दिंगलेश्वर महास्वामी यांनी लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र  भाजप, काँग्रेसच्या विनंतीवरून त्यांनी माघार घेतली. समाजासाठी लढा चालूच राहील, असे सांगत त्यांनी माघार घेतल्याने मुख्य लढत काँग्रेसचे विनोद आसुती यांच्याशी होणार आहे. समाजाच्या नाराजीचा फटका भाजपला बसणार का? अशी चर्चा आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
लिंगायत समाजाचा जोशी यांच्यावर रोष.
आसुती नवखे असल्याने चुरस नाही.
लिंगायत समाजाची नाराजी असून, याची राज्यभर चर्चा आहे. त्याचा फटका बसेल.
धारवाड परिसरातील दुष्काळाने ग्रामीण भागात उत्साह नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Loksabha Election 2024 - Lingayat community upset over Prahlad Joshi; Will BJP get hit in Dharwad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.