'देश घडवणारे-बिघडवणारे यांच्यातील फरक ओळखा, देश सध्या निर्णायक वळणावर उभा आहे' : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 08:39 AM2024-04-05T08:39:33+5:302024-04-05T08:40:19+5:30

Lok Sabha Electon 2024: ‘देश सध्या निर्णायक वळणावर उभा आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक वर्गाला देश घडवणारे आणि देश बिघडवणारे यांच्यातील फरक ओळखावा लागेल,’ असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केले.

Lok Sabha Electon 2024: 'Know the difference between those who build and destroy the country, the country is at a turning point': Rahul Gandhi | 'देश घडवणारे-बिघडवणारे यांच्यातील फरक ओळखा, देश सध्या निर्णायक वळणावर उभा आहे' : राहुल गांधी

'देश घडवणारे-बिघडवणारे यांच्यातील फरक ओळखा, देश सध्या निर्णायक वळणावर उभा आहे' : राहुल गांधी

 नवी दिल्ली - ‘देश सध्या निर्णायक वळणावर उभा आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक वर्गाला देश घडवणारे आणि देश बिघडवणारे यांच्यातील फरक ओळखावा लागेल,’ असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केले.

काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडी म्हणजे तरुणांना पहिल्या नोकरीची गॅरंटी, शेतकऱ्यांना एमएसपीची गॅरंटी, प्रत्येक गरीब महिला करोडपती, मजुराला किमान ४०० रुपये प्रतिदिन, जात जनगणना, आर्थिक सर्वेक्षण आणि संविधान-नागरिकांचे अधिकार सुरक्षित’, असे राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले. 

भाजप म्हणजे बेरोजगारीची गॅरंटी, शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा, असुरक्षित आणि हक्कापासून वंचित महिला, असहाय आणि लाचार मजूर, वंचितांबरोबर भेदभाव आणि शोषण, हुकूमशाही आणि बेगडी लोकशाही असा दावाही त्यांनी केला. तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे, विचार करा, समजून घ्या आणि योग्य निर्णय घ्या, असे राहुल गांधी म्हणाले.

आरबीआयच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष : जयराम रमेश
कोणत्याही किमतीत देणग्या मिळविण्याच्या भाजपच्या प्रयत्नांतून आरबीआयच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून निवडणूक रोखे योजना पुढे रेटण्यात आली, त्याची किंमत देशाने चुकवली, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये केली. ३३ तोट्यात चाललेल्या कंपन्यांनी ५८२ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे दिले असून त्यातील ७५ टक्के भाजपला दिले, असा दावाही त्यांनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघात केलेल्या ‘रोड शो’ दरम्यान काँग्रेसने भाजपला घाबरून त्यांचे आणि सहकारी पक्ष आययूएमएलचे झेंडे दाखवले नाहीत. गांधींकडे स्वतःच्या पक्षाचा झेंडा जाहीरपणे दाखविण्याचे धैर्य नाही. त्यांना इंडियन युनियन मुस्लीम लीगची (आययूएमएल) मते हवी आहेत, परंतु त्यासाठी त्यांना त्यांचा झेंडा महत्त्वाचा वाटत नाही. 
- पिनराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ

राहुल गांधी यांनी मित्रपक्ष आययूएमएलचे झेंडे रोड शो दरम्यान दाखवले नाहीत. त्यांना त्यांचा संकोच वाटत असल्याचे दिसते. तसे असेल तर त्यांनी इंडियन युनियन मुस्लीम लीगचा पाठिंबा नाकारला पाहिजे. काँग्रेसने बंदी घातलेल्या पीएफआय राजकीय शाखा असलेल्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा स्वीकारल्याचा धक्का बसला आहे.
- स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री 

काँग्रेस नेत्यांचा राहुल गांधींवर विश्वास उडाल्यामुळे त्यांना पक्षांतर करण्यास भाग पडत आहे. राहुल गांधी त्यांचे राजकीय विचार पटवून देण्यात अपयशी ठरत आहेत. 
- सुधांशू त्रिवेदी, राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप

Web Title: Lok Sabha Electon 2024: 'Know the difference between those who build and destroy the country, the country is at a turning point': Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.