J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 11:07 IST2024-04-28T10:55:22+5:302024-04-28T11:07:49+5:30
Lok Sabha Elections 2024 J P Nadda And Mamata Banerjee : जेपी नड्डा यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "ममता बॅनर्जींच्या राजवटीत शेख शाहजहांसारखे लोक महिलांसाठी धोकादायक बनले होते. तिथे गेलेल्या तपास यंत्रणांवर जीवघेणे हल्ले झाले होते. संदेशखालीमध्ये जनतेच्या सुरक्षिततेसाठी एनएसजीच्या कमांडोजना उतरावे लागले."
"ममताजी काय लोकांना घाबरवून, धमक्या देऊन, त्यांचा जीव घेऊन निवडणूक जिंकणार आहेत? जर ममता बॅनर्जी यांना असं वाटत असेल तर ती त्यांची सर्वात मोठी चूक आहे. ज्या बंगालमध्ये शास्त्रीय संगीत ऐकायला यायला हवं होतं तिथे आता बॉम्ब आणि पिस्तुल सापडत आहे. ममताजी, तुम्ही बंगालचं काय केलं?" असं म्हणत जेपी नड्डा यांनी खोचक टोला लगावला आहे.
संदेशखाली ममता की निर्ममता और बर्बरता का संदेश चीख-चीख कर दे रही है!
— BJP (@BJP4India) April 28, 2024
ममता बनर्जी कान खोल कर सुन लें...संदेशखाली की महिलाएं अकेली नहीं हैं... उनके साथ पूरा देश और समाज खड़ा है, इन्हें न्याय मिलकर रहेगा। पश्चिम बंगाल की जनता इसका करारा जवाब देगी।
- श्री @JPNaddapic.twitter.com/A8wtw3Wyo9
"सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यांसारख्या लोकांनी अशा बंगालची कधी कल्पना केली होती का? जनता तुम्हाला चोख प्रत्युत्तर देईल आणि भाजपा येथे 35 जागा जिंकेल. संदेशखाली येथील पीडितेला तिकीट देऊन भाजपाने महिला सक्षमीकरणाचा आदर्श घालून दिला आहे. भाजपाने ममता बॅनर्जींना सांगितलं आहे की, संदेशखालीतील महिला एकट्या नाहीत" असं देखील जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे.