Lok Sabha Elections 2024: मुलाच्या प्रचारात वडील, तर आईसाठी मुलीचा जोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 06:07 AM2024-04-16T06:07:25+5:302024-04-16T06:07:49+5:30

निवडणुकांमध्ये अनेकदा एकाच कुटुंबातील लाेक एकमेकांविराेधात उभे राहिलेले दिसतात.

Lok Sabha Elections 2024 Father campaigning for son, daughter for mother | Lok Sabha Elections 2024: मुलाच्या प्रचारात वडील, तर आईसाठी मुलीचा जोर

Lok Sabha Elections 2024: मुलाच्या प्रचारात वडील, तर आईसाठी मुलीचा जोर

सुरेश डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क
जम्मू
: निवडणुकांमध्ये अनेकदा एकाच कुटुंबातील लाेक एकमेकांविराेधात उभे राहिलेले दिसतात. काश्मीरमध्ये यावेळी जरा वेगळेच चित्र आहे. मुलासाठी पिता लाेकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरला आहे. तर आईसाठी मुलीने प्रचाराची धुरा सांभाळली आहे. फरक फक्त एवढाच की, दाेघांचे मतदारसंघ वेगवेगळे आहेत. हे वडील म्हणजे, फारुख अब्दुल्ला आणि मुलगी म्हणजे इल्जिता मु्फ्ती.

माजी मुख्यमंत्री व नॅशनल काॅन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला हे बारामुल्ला येथून लाेकसभा लढवित आहेत. त्यांच्यासाठी फारुख अब्दुल्ला प्रचारात उतरले आहेत. इल्जिता या आई महबूबा मुफ्ती यांच्यासाठी प्रचार करीत आहेत. पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती या राजाैरी-अनंतनाग मतदारसंघातून लढत आहेत.

Web Title: Lok Sabha Elections 2024 Father campaigning for son, daughter for mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.