Lok Sabha Election Result 2024 : "मैत्री अखंड राहो"; रशियापासून फ्रान्स, अमेरिकेपर्यंत ७५ हून अधिक देशांनी केलं मोदींचं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 10:04 AM2024-06-06T10:04:04+5:302024-06-06T10:10:37+5:30

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय नोंदवला म्हणून जगभरातील ७५ हून अधिक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेसेज पाठवले आहेत.

Lok Sabha Election Result 2024 75 countries congratulate Narendra Modi and alliance for their third time victory | Lok Sabha Election Result 2024 : "मैत्री अखंड राहो"; रशियापासून फ्रान्स, अमेरिकेपर्यंत ७५ हून अधिक देशांनी केलं मोदींचं अभिनंदन

Lok Sabha Election Result 2024 : "मैत्री अखंड राहो"; रशियापासून फ्रान्स, अमेरिकेपर्यंत ७५ हून अधिक देशांनी केलं मोदींचं अभिनंदन

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय नोंदवला म्हणून जगभरातील ७५ हून अधिक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेसेज पाठवले आहेत. आशिया, युरोप, आफ्रिका, पश्चिम आशिया आणि कॅरिबियन देशांसह विविध क्षेत्रांतील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत विजयासाठी शुभेच्छा देणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये यूएईचे शेख मोहम्मद बिन जायेद अल नाहयान, यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, लिथुआनियाचे गितान्स नौसेदा, सिंगापूरचे लॉरेन्स वोंग, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि मालदीवचे मोहम्मद मुइज्जू यांचा समावेश आहे. 

व्लादिमीर पुतिन यांनी फोनवर केलं अभिनंदन 

G20 देशांमधील इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स, अमेरिका, युनायटेड किंगडम आणि रशियाच्या नेत्यांनी मोदींचं अभिनंदन केलं आहे. त्याच वेळी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह काही जागतिक नेत्यांनी पंतप्रधान मोदींचं वैयक्तिक अभिनंदन करण्यासाठी फोन केला.

ज्यो बायडेन यांनीही केला फोन 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन करताना भारत आणि अमेरिकेतील मैत्री वाढत असल्याचं सांगितलं. त्यांनी फोन करून पंतप्रधान मोदींचे विजयाबद्दल हार्दिक अभिनंदनही केले.

डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा 

डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिकसेन यांनी पंतप्रधान मोदींचं लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन करताना म्हटलं की, दोन्ही देशांमधील "मजबूत सहकार्य" सुरू ठेवण्यास तत्पर आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लोकशाही निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन. मी आमच्या ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपसह आमचं मजबूत सहकार्य सुरू ठेवण्यास तत्पर आहे." 

2024 च्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली. निवडणूक आयोगाने 543 लोकसभा मतदारसंघांचे निकाल जाहीर केले, ज्यामध्ये भाजपाने 240 जागा जिंकल्या आणि काँग्रेसला 99 जागा मिळाल्या. मतमोजणीनंतर भाजपाला बहुमताच्या 272 पेक्षा 32 जागा कमी पडल्या. 2014 मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर ही पहिलीच वेळ आहे की त्यांना स्वबळावर बहुमत मिळालं नाही.
 

Web Title: Lok Sabha Election Result 2024 75 countries congratulate Narendra Modi and alliance for their third time victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.