लोकसभा 2024: निवडणुकीत ‘डिपाॅझिट जप्त हाेणे’ म्हणजे नेमके काय? 'तशी' वेळ कधी येते?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 03:20 PM2024-03-20T15:20:40+5:302024-03-20T15:21:14+5:30

लाेकसभा निवडणुकीत आतापर्यंत ७१ हजार उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले आहे

Lok Sabha Election 2024 What exactly is 'deposit forfeiture' in elections When does 'that' time come | लोकसभा 2024: निवडणुकीत ‘डिपाॅझिट जप्त हाेणे’ म्हणजे नेमके काय? 'तशी' वेळ कधी येते?

लोकसभा 2024: निवडणुकीत ‘डिपाॅझिट जप्त हाेणे’ म्हणजे नेमके काय? 'तशी' वेळ कधी येते?

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: निवडणुकीत उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाल्याचे तुम्ही ऐकलेच असेल. उमेदवाराला त्या मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी एक षष्ठमांश किंवा साधारणत: १६ टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली, तर त्याचे डिपाॅझिट म्हणजेच सुरक्षा ठेवेची रक्कम परत दिली जात नाही. लाेकसभा निवडणुकीत आतापर्यंत ७१ हजार उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले आहे. निवडणूक आयाेगाकडून ही माहिती मिळाली आहे.

  • ५०० रुपये डिपाॅझिटची रक्कम १९५१मध्ये झालेल्या पहिल्या लाेकसभा निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी हाेती.
  • २५० रुपये डिपाॅझिटची रक्कम मागसवर्गीय, अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी हाेती.
  • २५ हजार रुपये डिपाॅझिट सध्या भरावे लागते खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना.
  • १२,५०० रुपये भरावे लागतात मागसवर्गीय, अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना.


राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांची कामगिरी सरस

वर्ष - डिपाॅझिट जप्त झालेले उमेदवार - एकूण उमेदवार

  • १९५१ - ३४४ - १,२१७
  • १९५७ - १३० - ९१९
  • १९७७ - १०० - १,०६०
  • २००९ - ७७९ - १,६२३

Web Title: Lok Sabha Election 2024 What exactly is 'deposit forfeiture' in elections When does 'that' time come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.