भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांची माघार; भाजपला मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 10:26 IST2019-04-28T10:26:33+5:302019-04-28T10:26:44+5:30
भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघातून प्रज्ञा सिंह ठाकूर यांची नावकरी प्रज्ञा ठाकूर यांनी देखील आपली उमेदवारी दाखल केली होती. एकच नाव असलेल्याने मतविभाजन होण्याची भीती भाजपला होती.

भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांची माघार; भाजपला मोठा दिलासा
ref='http://www.lokmat.com/topics/bhopal-pc/'>भोपाळ - मध्य प्रदेशातील भोपाळ मतदार संघातून पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामध्ये प्रज्ञा ठाकूर यांचे नाव देखील सामील आहे. होय तुम्ही बरोबर वाचलत, प्रज्ञा ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र या प्रज्ञा ठाकूर वेगळ्या आहेत. या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर नसून अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर आहेत. प्रज्ञा ठाकूर यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पाठिंबा देत उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघातून प्रज्ञा सिंह ठाकूर यांची नावकरी प्रज्ञा ठाकूर यांनी देखील आपली उमेदवारी दाखल केली होती. एकच नाव असलेल्याने मतविभाजन होण्याची भीती भाजपला होती. यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी स्वत: अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांना घरी बोलवून त्यांची समजूत काढली. प्रज्ञा ठाकूर यांना निवडणूक न लढविण्याचे आवाहन साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना केले. त्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. तसेच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी माघार घेतल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, दोन प्रज्ञा आमने-सामने असूच शकत नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवार प्रज्ञाने उमेदवारी मागे घेतली आहे. यावेळी प्रज्ञा यांना भगवी शाल देऊन साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले.