Lok Sabha Election 2019: गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथांची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 04:42 PM2019-05-15T16:42:52+5:302019-05-15T16:43:15+5:30

लोकसभा निवडणुकीत भाजपने गोरखपूरमधून अभिनेता रवी किशन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात येथील लढत योगी आणि विरोधकांमध्येच रंगली आहे. आदित्यनाथ यांच्यासाठी गोरखपूरची लढाई प्रतिष्ठेची आहे.

Lok Sabha Election 2019: cm yogi adityanath is so serious for gorakhpur | Lok Sabha Election 2019: गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथांची प्रतिष्ठा पणाला

Lok Sabha Election 2019: गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथांची प्रतिष्ठा पणाला

Next

नवी दिल्ली - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपली कर्मभूमी असलेल्या गोरखपूरमधून अपराजित मानले जातात. सलग पाचवेळा योगी यांनी गोरखपूरचे प्रतिनिधीत्व केले. मात्र उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत योगी आदित्यनाथ यांना गोरखपूर भाजपकडे राखण्यात अपयश आले होते. ही बाब मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे गोरखपूर पुन्हा मिळविण्यासाठी योगी आता हाटयोग करताना दिसत आहेत. अर्थात या जागेसाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने गोरखपूरमधून अभिनेता रवी किशन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात येथील लढत योगी आणि विरोधकांमध्येच रंगली आहे. आदित्यनाथ यांच्यासाठी गोरखपूरची लढाई प्रतिष्ठेची आहे. मात्र समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या युतीमुळे बघडलेली जातीची समीकरणे योगींना जुळवावी लागणार आहेत. युतीकडून राम भुआल निषाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी काँग्रेसचे उमेदवार मधूसुदन त्रिपाठी यांनी ही लढाई आणखीनच कठिण केली आहे.

२०१८ मध्ये झालेल्या पोट निवडणुकीत सपाच्या प्रविण निषाद यांनी भाजपच्या उपेंद्र शुक्ल यांना पराभूत केले होते. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. देशात भाजप कितीही मजबूत असू द्या, मात्र गोरखपूरमधील विजय येथील गोरक्षपीठामुळेच शक्य आहे, हेच तेंव्हा स्पष्ट झाले होते. आदित्यनाथ आणि त्यांचे गुरू ब्रह्मलीन महंत अवेद्यनाथ यांनी १९८९ पासून या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यापूर्वी आदित्यनाथ यांचे गुरू महंत दिग्विजय देखील गोरखपूरमधून निवडून आले होते. गोरक्षपीठाविषयी येथील लोकांमध्ये एक आस्था आहे. गोरक्षपीठाशी जोडलेल्या उमेदवाराचा विजय निश्चित असं जणू समीकरणच तयार झालं आहे.

गोरक्षनाथ मंदिराशी संबंधीत व्यक्ती भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवार नसल्यास येथील जनतेचा पाठिंबा मिळणार नाही, हे पोटनिवडणुकीत उपेंद्र शुक्ल यांच्या पराभवाने अधोरेखीत झाले आहे. आता भाजपने अभिनेता रवी किशनला येथून तिकीट दिले. त्यामुळे पुन्हा एकदा गोरक्षनाथ मंदिरांशी निगडीत व्यक्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र ही निवडणूक रवी किशन नाही तर मी लढवत असल्याचे योगी सांगत आहेत. गोरखपूरमध्ये विकासाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागले आहे. पूर्वी विकासासंदर्भात अनेक मुद्दे होते. योगी मुख्यमंत्री झाल्यापासून हे प्रश्न सुटले आहेत.

आदित्यनाथ यांचा पुढाकार

भाजप उमेदवारासाठी योगी आदित्यनाथ मैदानात उतरल्यामुळे येथील स्थिती बदलत आहे. या लोकसभा मतदार संघातील पाचही विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत. पाचही आमदार जातीय समीकरणे जुळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल देखील याच जिल्ह्यातील आहेत. यासह इतर मंत्र्यांनी देखील गोरखपूरमध्ये तळ ठोकले आहे. तर भाजप अध्यक्ष अमित शाह येथे रोड शो करणार आहे. मात्र रवी किशन यांच्याविषयी स्थानिक युवकांमध्ये जोश दिसत नसल्याचे चित्र आहे. ही बाब भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराला पराभूत करणारे प्रविण निषाद सध्या भाजपमध्ये आहेत. यामुळे भाजपला फारसा फायदा होईल, असं दिसत नाही.

युती मजबूत

यादव, निषाद, मुस्लीम आणि दलितांव्यतिरिक्त सैंथवार, कुर्मीसह अनेक मागास जातींची मते सपा, बसपा युतीचे उमेदवार राम भुआल निषाद यांच्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच भाजपमध्ये सामील झालेल्या राजमती निषाद आणि त्यांचे पुत्र अमरेंद्र निषाद पुन्हा सपामध्ये परतले आहेत. तर योगी आदित्यनाथ यांचे निकटवर्तीय हिंदू युवा वाहिनीचे सुनील सिंह यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यांनंतर त्यांनी देखील युतीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे.

काँग्रेसचा डाव

काँग्रेसचे उमेदवार मधुसूदन त्रिपाठी येथील अधिवक्ता आहेत. ब्राह्मण समुदायात त्यांची चांगला जनसंपर्क आहे. मागील अनेक वर्षांत काँग्रेसची येथील कामगिरी निराशाजनक आहे. मात्र यावेळी त्रिपाठी यांनी निवडणुकीत रंगत आणली आहे. त्रिपाठी यांच्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांव्यतिरिक्त युवा अधिवक्त्यांची टीम सक्रिय झाली आहे. तसेच काँग्रेस उमेदवार मोठ्या सभांऐवजी काँर्नर बैठकांवर भर देत आहेत. या मतदार संघात एकाही पक्षाने मुस्लीम उमेदवार उतरवला नाही. मात्र मुस्लीम मते निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे ही मते काँग्रेसला मिळेल की, सपा उमेदवाराला हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

२०१८ पोटनिवडणुकीतील मतं

     

पक्षउमेदवार               मतं
सपा-बसपाप्रविण निषाद४५६५१३
भाजपउपेंद्र शुक्ल४३४६३२
काँग्रेससुरहिता करीम१८८५८

 

 

२०१४ लोकसभा निवडणुकीत मतं

पक्षउमेदवारमतं
भाजपयोगी आदित्यनाथ५३९१२७
सपाराजमती निषाद२२६३४४
बसपाराम भुआल निषाद१७६४१२
काँग्रेसअष्टभुजा शुक्ला

४५७१९

 

 


 

 

 

Web Title: Lok Sabha Election 2019: cm yogi adityanath is so serious for gorakhpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.