Karnal Protest : जय जवान-जय किसान, एकीकडे झोपले शेतकरी अन् दुसरीकडे सैन्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 02:19 PM2021-09-08T14:19:20+5:302021-09-08T14:20:22+5:30

शेतकऱ्यांवर २८ ऑगस्टला बास्तारा येथील टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीसांनी लाठीमार केला होता. या घटनेच्या निषेधार्थ कर्नाल येथील सचिवालयाला घेराव टाकण्याचा इशारा दिला होता

Karnal Protest: Farmers on one side and army on the other, Jai Jawan - Jai Kisan | Karnal Protest : जय जवान-जय किसान, एकीकडे झोपले शेतकरी अन् दुसरीकडे सैन्य

Karnal Protest : जय जवान-जय किसान, एकीकडे झोपले शेतकरी अन् दुसरीकडे सैन्य

googlenewsNext
ठळक मुद्देअन्नदाता शेतकरी आणि देश रक्षणासाठी लढणारा जवान हे देशाचे महत्त्वाचे स्तंभ आहेत. मात्र, हे दोन्हीही रस्त्यावर झोपल्याचे एकाच छायाचित्रात कैद झाले

कर्नाल : गेल्या महिन्यात शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराविराेधात आक्रमक झालेल्या हरयाणातील हजारो शेतकऱ्यांनी कर्नाल येथील मिनी सचिवालयाला घेराव टाकला. बॅरिकेड्स तोडून शेतकरी सचिवालयापर्यंत पोहोचले. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. त्यात १० जण जखमी झाले आहेत. तरीही, शेतकरी मागे हटले नाहीत. रात्रीही सचिवालयाच्या बाहेरच झोपून त्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. या दरम्यान, झोपलेल्या शेतकरी आणि सैन्य दलातील जवानांचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

शेतकऱ्यांवर २८ ऑगस्टला बास्तारा येथील टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीसांनी लाठीमार केला होता. या घटनेच्या निषेधार्थ कर्नाल येथील सचिवालयाला घेराव टाकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर, शेतकऱ्यांनी मंगळवारी कर्नाल येथील सचिवालयाला घेराव घातला. यावेळी, रात्र रस्त्यावर झोपूनच काढली. शेतकऱ्यांसह सैन्य दलातील सुरक्षा जवानांनीही रस्त्यावरच पाठ मोकळी केली. अन्नदाता शेतकरी आणि देश रक्षणासाठी लढणारा जवान हे देशाचे महत्त्वाचे स्तंभ आहेत. मात्र, हे दोन्हीही रस्त्यावर झोपल्याचे एकाच छायाचित्रात कैद झाले. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेतकरी आंदोलनाचे अपडेट देणाऱ्या एका ट्विटर हँडलनेही हे फोटो शेअर केले आहेत.  

राज्य सरकारसोबतची चर्चा फिस्कटली

पोलिसांच्या लाठीमारात अनेक शेतकरी आणि काही पोलीस जखमी झाले होते. एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला होता. जिल्हाधिकारी आयुष सिन्हा यांनी यावेळी शेतकऱ्यांची डोकी फोडा, असे वादग्रस्त आदेश दिल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. या घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्य किसान मंचतर्फे महापंयाचत बोलाविण्यात आली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी हजारोंच्या संख्येने शेतकरी त्यात सहभागी झाले होते. इतर राज्यातील शेतकऱ्यांचीही महापंचायतमध्ये उपस्थिती होती. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या ११ सदस्यीय शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले होते. मात्र, ही चर्चा फस्कटली. 

सहभागी शेतकरी नेते

भारत किसान युनियनचे नेते राकेश टीकैत यांच्यासह याेगेंद्र यादव, बलबीरसिंग राजेवाल, जोगींदरसिंग उग्रहान, दर्शन पाल यांच्यासह संयुक्त किसान मोर्चाचे नेते सहभागी झाले हाेते. मात्र, पाेलीसांनी सर्व नेत्यांना नमस्ते चौकाच ताब्यात घेतले. आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार, वादग्रस्त जिल्हाधिकाऱ्यांच्या निलंबनावर शेतकरी ठाम
 

Web Title: Karnal Protest: Farmers on one side and army on the other, Jai Jawan - Jai Kisan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.