Kanpur Violence: कानपूर हिंसाचारात नवीन खुलासा; अवैध इमारतींमधून दगडफेक, देशी बॉम्ब आणि 141 व्हॉट्सअॅप ग्रुप...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 11:52 AM2022-06-06T11:52:28+5:302022-06-06T11:52:44+5:30

Kanpur Violence: कानपूर हिंसाचारप्रकरणी 36 जणांची ओळख पटली असून, मुख्य सूत्रधार जफर हयात हाश्मी याच्यासह 29 जणांना अटक केली आहे.

Kanpur Violence: New revelation in Kanpur violence case; Stone throwing from illegal buildings, desi bombs found on road | Kanpur Violence: कानपूर हिंसाचारात नवीन खुलासा; अवैध इमारतींमधून दगडफेक, देशी बॉम्ब आणि 141 व्हॉट्सअॅप ग्रुप...

Kanpur Violence: कानपूर हिंसाचारात नवीन खुलासा; अवैध इमारतींमधून दगडफेक, देशी बॉम्ब आणि 141 व्हॉट्सअॅप ग्रुप...

Next

Kanpur Violence:उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हिंसाचारप्रकरणी सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या हिंसाचाराचा सूत्रधार आणि मौलाना मोहम्मद अली जोहर फॅन्स असोसिएशनचा प्रमुख जफर हयात हाश्मीच्या मोबाईलमधून नवनवीन गुपिते उघड होत आहेत. त्याच्या मोबाईलमध्ये एकूण 141 व्हॉट्सअॅप ग्रुप सापडले आहेत. जवळपास सर्वच गटात बाजार बंद आणि हिंसाचार झाल्याची चर्चा आहे. हिंसाचाराच्या दिवसाचे प्रत्येक क्षणाचे अपडेट त्याच्या ग्रुपमध्ये दिले जात होते. कोणी व्हिडिओ पोस्ट करत होते तर कोणी फोटो आणि मेसेज पाठवत होते. आता पोलिसांनी पुरावा म्हणून या चॅटचा तपासात समावेश केला आहे.

मोबाईलमधून अनेक खुलासे 
पोलिसांनी हयात आणि इतर आरोपींचे मोबाईल जप्त केले होते. हयातच्या मोबाईलमध्ये मुस्लिम संघटनांचे व्हॉट्सअॅप ग्रुप सापडले आहेत. हिंसाचाराच्या दिवशी सकाळपासूनच जवळपास प्रत्येक ग्रुप सक्रिय होता. MMA जोहर फॅन्स असोसिएशन कानपूर टीम नावाच्या ग्रुपमध्ये बहुतेक संभाषणे आणि अपडेट्स केले जात होते. बाजार बंदबाबत गटाची आपापसात चर्चा झाली. सर्व बातम्यांचे कटिंग्सही सापडले. विशेष म्हणजे, आंदोलन मागे घेण्याचे हाश्मीचे वक्तव्य पोलिसांना चकमा देण्यासाठी होते. तो सतत लोकांना भडकावण्यात गुंतला होता आणि त्याची पत्नीही यात सहभागी होती. त्याच्या अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील चॅट्समधून याचा खुलासा झाला आहे.

देशी बॉम्ब रस्त्याच्या कडेला आढळले
या प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा असा झाला आहे की, हिंसाचाराच्या वेळी उंच इमारतींवरून दगडफेक करण्यात आली होती. नवीन रस्ता आणि बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली उच्चभ्रू इमारत सुरक्षेसाठी मोठा धोका होत्या. आता पोलिस सहआयुक्तांनी कानपूर विकास प्राधिकरणाला चौकशी आणि कारवाईसाठी पत्र पाठवले आहे. जाजमाळ, बाबूपुरवा, गडारियन पूर्वेसह इतर अनेक भागातूनही गोंधळ घालणारे लोक आल्याचे समोर आले आहे. नवीन रस्त्याच्या आजूबाजूच्या मशिदींमध्ये नमाज अदा करण्याचे आदेश त्यांना मिळाले होते. नमाजानंतर कापड ओवाळताच दगडफेक व्हायची. हाताने बनवलेले देशी बॉम्ब रस्त्याच्या कडेला पडलेले आढळले आहेत.

मास्टरमाइंडसह 29 जणांना अटक

कानपूर हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 36 गुन्हेगारांची ओळख पटवली आहे. कानपूर हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार जफर हयात हाश्मी, जावेद अहमद खान, मोहम्मद राहिल आणि मोहम्मद सुफियान अहमसह पोलिसांनी आतापर्यंत 29 जणांना अटक केली आहे. तर सपा नेत्याचे नाव यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जफर हयात हाश्मी याने चौकशीत सांगितले आहे की, देशाला संदेश देता यावा म्हणून 3 जून ही तारीख जाणूनबुजून निश्चित करण्यात आली होती. 

Web Title: Kanpur Violence: New revelation in Kanpur violence case; Stone throwing from illegal buildings, desi bombs found on road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.