वधू मेकअपसाठी ब्युटी पार्लरला गेली अन् परतलीच नाही! वरातीत नाचणारी वऱ्हाडी पोहोचली ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 15:30 IST2022-05-19T15:28:49+5:302022-05-19T15:30:23+5:30
उज्जैन येथूल आलेल्या वरातीला वधूला न घेताच माघारी परतावं लागलं आहे. हे प्रकरणं इंदूर येथील आहे.

वधू मेकअपसाठी ब्युटी पार्लरला गेली अन् परतलीच नाही! वरातीत नाचणारी वऱ्हाडी पोहोचली ठाण्यात
इंदूर
उज्जैन येथूल आलेल्या वरातीला वधूला न घेताच माघारी परतावं लागलं आहे. हे प्रकरणं इंदूर येथील आहे. उज्जैन येथून इंदूरमध्ये एक वरात बँडच्या ठेक्यावर मोठ्या जल्लोषात नाचत वधूच्या घरी आली खरी पण नवरी ब्यूटी पार्लरला जाते सांगून बाहेर पडली ती घरी परतलीच नाही. त्यानंतर लग्न मंडपात एकच गहजब उडाला. सर्वजण पोलीस ठाण्यात गेले आणि वधूच्या कुटुंबीयांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. संबंधित वधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचीही माहिती समोर आली आहे.
इंदूरच्या एमजी रोड पोलीस ठाणे क्षेत्रात एक वरात उज्जैनहून आली होती. दारात वरात पोहोचली पण लग्नाआधी वधूचा काही पत्ता लागेना. सिनेमांमध्ये लग्न मंडपातून वधू किंवा वर पळून गेल्याचं आपण पाहिलं आहे. पण इथं वधूनं मेकअपसाठी ब्युटी पार्लरमध्ये जातेय असं सांगून घर सोडलं आणि ती परत आलीच नाही.
वधूच्या कुटुंबीयांनी देखील बराच वेळ वर पक्षाला याची माहिती कळू दिली नाही. वधू बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यापाठोपाठ वरपक्षाचीही माणसं पोलीस ठाण्यात पोहोचली. जिथं शेरवानी, पगडी असा सजलेला नवरदेव पोलीस ठाण्यात आपल्या भावी पत्नीची बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यासाठी पोहोचला होता. रात्री उशीरापर्यंत नवरदेव पोलीस ठाण्यातच होता. याप्रकरणाचा आपल्या कुटुंबाला भविष्यात कोणताही त्रास दिला जाऊ नये असं एक पत्र देखीर वरपक्षाच्या वतीनं पोलिसांना देण्यात आलं आहे.