IMA ने आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांना लिहिले पत्र; डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 23:26 IST2024-08-21T23:23:00+5:302024-08-21T23:26:00+5:30
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरच्या निर्घृण हत्येमुळे देशभरातील डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. डॉक्टर अनेक दिवसांपासून संपावर आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने पावले उचलावीत अशी मागणी करत आहेत.

IMA ने आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांना लिहिले पत्र; डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची केली मागणी
कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ देशभरात सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपादरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनने बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांना पत्र लिहून अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. आयएमएने आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला असून यासाठी कायदा करण्याची विनंती केली आहे.
video: विनेश फोगाट काँग्रेसकडून विधानसभा लढवणार? भूपेंद्र हुड्डा म्हणाले, 'आमची इच्छा तर...'
IMA ने जेपी नड्डा यांच्याकडे महामारी रोग सुधारणा कायदा,२०२० चा सुधारित भाग आणि केरळ सरकारचा कोड ग्रे प्रोटोकॉल विधेयक २०१९ च्या मसुद्यात समाविष्ट करण्याची मागणी केली. IMA ने लिहिले की, 'आम्ही मागणी करतो की मसुदा विधेयक २०१९ मध्ये महामारी रोग सुधारणा कायदा, २०२० आणि केरळ सरकारच्या कोड ग्रे प्रोटोकॉलचा सुधारित भाग भारतातील डॉक्टरांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी अध्यादेशाच्या रूपात समाविष्ट करावा, अशा मागण्या केल्या आहेत.
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारने उचललेल्या पावलांचा उल्लेख करून, IMA नेही केंद्राचे आभार मानले आहेत. असोसिएशनने म्हटले आहे की, या उपाययोजना करूनही देशातील डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत अजूनही चिंता आहे. ज्या डॉक्टरांनी कर्तव्य बजावताना प्राण गमावले आहेत. या पत्रात यापूर्वीच्या चार डॉक्टरांच्या मृत्यूचाही उल्लेख आहे.
आरजी मेडिकल कॉलेजमध्ये ९ ऑगस्ट रोजी महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार आणि निर्घृण हत्येच्या घटनेबाबत IMA संपावर आहे, OPD सेवा बंद आहे. पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी देशभरातील अनेक डॉक्टर आणि आरोग्य व्यावसायिकांनी निदर्शने केली आहेत.