Hyderabad Lok Sabha Result 2024: सुरुवातीच्या निकालात ओवेसी आघाडीवर, माधवी लता करणारका 'कमबॅक'?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:15 AM2024-06-04T09:15:51+5:302024-06-04T09:18:39+5:30

येथे सर्व प्रथम झालेल्या पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीनंतर, आलेल्या सुरुवातीच्या निकालात एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी आघाडीवर आहेत.

Hyderabad Lok Sabha Result 2024 Asaduddin owaisi VS Madhavi Latha Hyderabad live result | Hyderabad Lok Sabha Result 2024: सुरुवातीच्या निकालात ओवेसी आघाडीवर, माधवी लता करणारका 'कमबॅक'?

Hyderabad Lok Sabha Result 2024: सुरुवातीच्या निकालात ओवेसी आघाडीवर, माधवी लता करणारका 'कमबॅक'?

Hyderabad Lok Sabha Result 2024 : हैदराबाद लोकसभेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. येथे असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या विरोधात भाजपने हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता (Madhavi Latha) यांना उमेदवारी दिली होती. त्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून सातत्याने चर्चेत असतात. यातच हैदराबाद सारख्या जागेवर भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने त्यांची लोकप्रियता अधिक वाढली आहे. हैदराबाद लोकसभा हा ओवेसी यांचा गड मानला जातो. गेल्या १९८४ पासून ही जागा ओवेसी कुटुंबाच्या त्याब्यात आहे. गेल्या १३ मे सोजी हैदराबद लोकसभेसाठी मतदान झाले होते. आज मत मोजणी होत आहे.

येथे सर्व प्रथम झालेल्या पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीनंतर, आलेल्या सुरुवातीच्या निकालात एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी आघाडीवर आहेत. तर माधवीलता पिछाडीवर आहेत. ओवेसी हे गेल्या 2004 पासून सलग चार वेळा हैदराबादचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर आता पाचव्यांदा पुन्हा एकदा मैदानात आहेत. ते ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते नेहमीच आपल्या वक्तव्याने चर्चेत राहतात.

माधवी लता यांनी 2018 मध्ये भाजपच्या सहाय्याने पहिल्यांदाच राजकारणात पाऊल ठेलवे होते. यानंतर त्यांनी 2019 मध्ये आंध्र प्रदेशातील गुंटूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. यात त्यांचा मोठा पराभव झाला होता. माधवी लता या एक भरतनाट्यम डान्सरही आहेत. तसेच, त्या एक रुग्णालयाच्या चेयरपर्सन देखील आहेत. त्यांनी त्यांनी शिक्षण क्षेत्रातही काम केले आहेत.

Web Title: Hyderabad Lok Sabha Result 2024 Asaduddin owaisi VS Madhavi Latha Hyderabad live result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.