सौंदत्ती यल्लमा डोंगरावर मुसळधार पाऊस; रस्ता, गाड्या गेल्या वाहून, अनेक भक्त अडकून पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:38 IST2025-08-09T12:37:39+5:302025-08-09T12:38:53+5:30
पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली

सौंदत्ती यल्लमा डोंगरावर मुसळधार पाऊस; रस्ता, गाड्या गेल्या वाहून, अनेक भक्त अडकून पडले
चिक्कोडी : कर्नाटक, महाराष्ट्रसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लमा डोंगरास शुक्रवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला. पावसाच्या प्रवाहाने यल्लमा डोंगराला जोडणारा रस्ता वाहून गेला आहे.
सुमारे दोन तासांहून अधिक काळ पडलेल्या पावसामुळे परिसरातील नाले ओहोळ भरून वाहत आहेत. रस्ता वाहून गेल्याने मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने देवस्थानला येणाऱ्या भक्तांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.
दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे नाल्यांना पुराचे स्वरूप प्राप्त, मंदिराच्या शेजारी असलेला मुख्य रस्त्यावर पाणी आले. त्यामुळे अनेक दुचाकी वाहने वाहून गेली. अनेक घरांमध्ये पाणी घुसले.