मुंबईचे माजी पाेलिस आयुक्त अरुप पटनायक उतरले लाेकसभेच्या रिंगणात, संबित पात्रांना देणार आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 10:15 AM2024-04-03T10:15:13+5:302024-04-03T10:16:33+5:30

Arup Patnaik News: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून बिजू जनता दलाचे अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात उभे राहिले आहेत. 

Former Mumbai Police Commissioner Arup Patnaik entered the Lok Sabha arena, will challenge the candidates | मुंबईचे माजी पाेलिस आयुक्त अरुप पटनायक उतरले लाेकसभेच्या रिंगणात, संबित पात्रांना देणार आव्हान

मुंबईचे माजी पाेलिस आयुक्त अरुप पटनायक उतरले लाेकसभेच्या रिंगणात, संबित पात्रांना देणार आव्हान

भुवनेश्वर - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून बिजू जनता दलाचे अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात उभे राहिले आहेत. 

१९७९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी राहिलेले पटनायक हे फेब्रुवारी २०११ ते ऑगस्ट २०१२ दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त होते. पुरी येथे पक्षाचे चारवेळा खासदार असलेले पिनाकी मिस्रा यांचे तिकिट कापून पटनायक यांना पक्षाने संधी दिली आहे. संबित पात्रा यांनी पुरीमध्ये भाजपकडून २०१९ मध्ये निवडणूक लढविली होती, पण त्यांचा ११७१४ मतांनी पराभव झाला होता. 

कडक अधिकाऱ्याचा लाैकिक
पटनायक यांचा लौकिक एक स्पष्टवक्ता व कडक अधिकारी असा होता. पाच कनिष्ठ आयपीएस अधिकार्यांनी त्यांच्या हाताखाली काम करण्यास नकार दिला होता. तेव्हाचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना मध्यस्थी करावी लागली होती. 

Web Title: Former Mumbai Police Commissioner Arup Patnaik entered the Lok Sabha arena, will challenge the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.