चंद्राबाबू पुन्हा एनडीएत; भाजपला किती फायदा? दक्षिणेतील संख्याबळ वाढविण्यावर भर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 08:02 AM2024-03-12T08:02:54+5:302024-03-12T08:07:04+5:30

भाजपचे मिशन ४०० यशस्वी होईल का, याकडे लक्ष लागले आहे.

chandrababu again in nda how much benefit to bjp | चंद्राबाबू पुन्हा एनडीएत; भाजपला किती फायदा? दक्षिणेतील संख्याबळ वाढविण्यावर भर 

चंद्राबाबू पुन्हा एनडीएत; भाजपला किती फायदा? दक्षिणेतील संख्याबळ वाढविण्यावर भर 

हैदराबाद : लोकसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेसोबतच राज्यात विधानसभेच्याही निवडणुका होणार असल्याने प्रत्येक पक्षामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी अभिनेते पवन कल्याण यांच्यासह भाजपशी युती केली. चंद्राबाबू नायडू जवळपास १० वर्षांनंतर एनडीएमध्ये परतले आहेत. त्यामुळे भाजपचे मिशन ४०० यशस्वी होईल का, याकडे लक्ष लागले आहे.

का बाहेर पडले होते नायडू? 

२०१८ मध्ये संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी टीडीपीने आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी केली होती. परंतु, अधिवेशनात त्याची दखल न घेतल्याने भाजप व टीडीपीतील तणाव वाढला. त्यातूनच त्यांनी एनडीएतून बाहेर पडत मोदी सरकारविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणला होता.

युतीचे सूत्र काय असू शकते? 

आंध्र प्रदेशातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी टीडीपी आणि जनसेनेमध्ये जागावाटप आधीच झाले आहे. विधानसभेच्या १७५ जागांपैकी २४ जागा जनसेनेला दिल्या आहेत. लोकसभेच्या २५ पैकी जेएसपीसाठी तीन जागा सोडल्या आहेत. दुसरीकडे टीडीपीने ९४, तर जनसेनेने पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, टीडीपी-जनसेना युती भाजपसाठी लोकसभेच्या ५ ते ६, तर विधानसभेच्या १० ते १३ जागा सोडू शकते. भाजपकडून तिरुपती, राजमपेट, राजमुंद्री, अराकू आणि नरसापुरम लोकसभा मतदरारसंघातून उमेदवार दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 

Web Title: chandrababu again in nda how much benefit to bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.