नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:50 IST2025-12-31T16:49:15+5:302025-12-31T16:50:03+5:30
केंद्र सरकारकडून ₹20,668 कोटींच्या दोन महामार्ग प्रकल्पांना मंजुरी!

नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांवरील कॅबिनेट समितीने आज (31 डिसेंबर 2025) देशातील पायाभूत सुविधांना गती देणाऱ्या दोन प्रमुख महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांची एकूण अंदाजित किंमत ₹20,668 कोटी आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट (374 किमी) कॉरिडोर आणि ओडिशातील NH-326 (206 किमी) रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाचा समावेश आहे.
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोर: ₹19,142 कोटींचा ग्रीनफिल्ड प्रकल्प
कॅबिनेटने महाराष्ट्रात BOT (टोल) मोडवर 374 किमी लांबीच्या नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ₹19,142 कोटी आहे. हा कॉरिडोर नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडत कुरनूलपर्यंत कनेक्टिव्हिटी मजबूत करेल. हा उपक्रम पीएम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनअंतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकासाला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा आहे.
#WATCH | Delhi: Cabinet approves Construction of 6-lane greenfield access-controlled Nashik- Solapur-Akkalkot Corridor in Maharashtra on BOT (Toll) Mode with a project length of 374 km worth Rs.19,142 Crore.
— ANI (@ANI) December 31, 2025
Union Minister Ashwini Vaishnaw says, "...The Prime Minister has… pic.twitter.com/if4W8hskjF
प्रस्तावित ग्रीनफिल्ड कॉरिडोरला दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे (वधावन पोर्ट इंटरचेंजजवळ), आग्रा-मुंबई कॉरिडोर (NH-60, अडेगाव जंक्शन) आणि समृद्धी महामार्ग (पांगरी, नाशिकजवळ) यांच्याशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. हा 6-लेन, एक्सेस-कंट्रोल्ड कॉरिडोर पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व किनाऱ्यापर्यंत थेट कनेक्टिव्हिटी देईल. या प्रकल्पामुळे प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार असून, 201 किमी अंतरही कमी होणार आहे.
रोजगारनिर्मिती व प्रादेशिक विकास
या प्रकल्पातून 251.06 लाख मॅन-डे थेट रोजगार, 313.83 लाख मॅन-डे अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. परिसरातील आर्थिक हालचाली वाढून नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास होईल.
#WATCH | Delhi: Union Minister Ashwini Vaishnaw says, "The second project is of Odisha- NH 326. It will connect the interior areas of Odisha...The widening and strengthening of this highway was approved today... This project is 206 kms long, with an investment of Rs 1,526 crore,… pic.twitter.com/i14oD1MuHD
— ANI (@ANI) December 31, 2025
ओडिशात NH-326 चे रुंदीकरण: ₹1,526 कोटींची गुंतवणूक
कॅबिनेटने ओडिशा मधील NH-326 (Km 68.600 ते Km 311.700) या मार्गाचे पक्क्या शोल्डरसह 2-लेन रस्त्यात रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यास EPC मोडवर मंजुरी दिली. या प्रकल्पाचा एकूण खर्च: ₹1,526.21 कोटी आणि सिव्हिल कन्स्ट्रक्शन: ₹966.79 कोटी आहे.
या मार्गाची लांबी 206 किमी असून, या अपग्रेडेशनमुळे गजपती, रायगडा आणि कोरापुट जिल्ह्यांना थेट लाभ होऊन प्रवास अधिक जलद, सुरक्षित व विश्वासार्ह बनेल. या प्रकल्पांची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, विकसित भारतासाठी पायाभूत सुविधांची पायाभरणी मजबूत करण्यात आली असून, याचा सर्वाधिक फायदा मध्यमवर्गाला होईल.