आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 05:44 IST2024-05-04T05:40:00+5:302024-05-04T05:44:21+5:30

प्रज्वल दोरीने बांधून या महिलेवर अत्याचार करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

case of kidnapping of a woman has been registered against Prajwal Revanna | आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

म्हैसूर/बागलकोट/बंगळुरू :कर्नाटकचे माजी मंत्री एच. डी. रेवण्णा व त्यांचा मुलगा प्रज्वल यांच्याविरुद्ध एका महिलेच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पाच दिवसांपासून बेपत्ता या महिलेच्या मुलाने तक्रार दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रज्वल दोरीने बांधून या महिलेवर अत्याचार करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

पिता-पुत्राविरुद्ध होलेनरसीपुरा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. आता आणखी एक गुन्हा दाखल  करण्यात  आला आहे, असे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले. पोलिसांनी एच.डी. रेवण्णा आणि सतीश बबण्णा यांच्याविरुद्ध अपहरणासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करीत बबण्णाला अटक केली.

जामीन अर्ज मागे घेतला

माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांनी बंगळुरू सत्र न्यायालयातील आपला जामीन अर्ज शुक्रवारी मागे घेतला. रेवण्णा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र आरोप नसल्याचे एसआयटीने न्यायालयाला सांगितले हाेते.

बलात्काराचा गुन्हा दाखल

प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी सांगितले. म्हैसूर जिल्ह्यातील अपहृत महिलेचा शोध घेऊन तिची सुटका करण्याचे आदेश आपण पोलिसांना दिले आहेत, असेही ते म्हणाले.

Web Title: case of kidnapping of a woman has been registered against Prajwal Revanna