BJP चा गेम पॉवरफुल, INDIA आघाडीचा झाला डब्बा गुल; चंदीगड निवडणुकीत उधळला विजयाचा गुलाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 03:17 PM2024-01-30T15:17:10+5:302024-01-30T15:19:15+5:30

Chandigarh Mayor Elections 2024: इंडिया आघाडीपेक्षा संख्याबळ कमी असूनही भाजपाने चंदीगडमधील एका निवडणुकीत बाजी मारली.

bjp victory and congress aap india alliance defeat in chandigarh mayor elections 2024 | BJP चा गेम पॉवरफुल, INDIA आघाडीचा झाला डब्बा गुल; चंदीगड निवडणुकीत उधळला विजयाचा गुलाल

BJP चा गेम पॉवरफुल, INDIA आघाडीचा झाला डब्बा गुल; चंदीगड निवडणुकीत उधळला विजयाचा गुलाल

Chandigarh Mayor Elections 2024: एकीकडे इंडिया आघाडीत संभ्रमाचे वातावरण असताना, दुसरीकडे भाजपाने मात्र चंदीगडमध्ये झालेल्या एका निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला आहे. चंदीगड महापौर निवडणुकीत इंडिया आघाडीपेक्षा कमी नगरसेवक असूनही भाजपा उमेदवार मनोज सोनकर यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली आहे. 

महापौर निवडणुकीत २० नगरसेवकांच्या इंडिया आघाडीचा पराभव झाला. मनोज सोनकर १६ मतांनी विजयी झाले. चंदीगडच्या महापौर निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांकडून गोंधळ सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. मतांचे गणित इंडिया आघाडीच्या बाजूने असतानाही काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या संयुक्त उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. 

आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचे २० नगरसेवकांचे संख्याबळ

चंदीगड महापालिकेत भाजपाचे १४ नगरसेवक आहेत. संख्याबळाच्या दृष्टीने भाजप सर्वांत मोठा पक्ष आहे. तर, आम आदमी पक्ष १३ नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. काँग्रेसचे ७ तर शिरोमणी अकाली दलाचा एक नगरसेवक आहेत. चंदीगड महापौर निवडणुकीत स्थानिक खासदारांना मतदानाचा अधिकार आहे. भाजपाच्या किरण खेर या चंदीगडमधून खासदार आहेत. किरण खेर यांचाही समावेश केल्यास भाजपचे संख्याबळ १५ वर पोहोचते, तर आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचे संख्याबळ २० नगरसेवकांचे आहे.

महापौर निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय निश्चित मानला जात होता, पण...

चंदीगड महापालिकेत एकूण ३५ नगरसेवक असून एका खासदाराचे मत ग्राह्य धरल्यास ही संख्या ३६ मते होतात. महापौर निवडणुकीत विजयासाठी १९ मतांचा आकडा गाठणे आवश्यक होते. भाजपाचे नगरसेवक आणि खासदारांसह संख्याबळाची बेरीज १५ मते होत होती. शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव नगरसेवकाचे मतही जोडले तर भाजपचे मताधिक्य १६ वर जात होते. आम आदमी पक्ष १३ आणि काँग्रेसच्या ७ मतांसह मतांची संख्या २० वर पोहोचत होती. दोन्ही पक्षांनी सहमतीने संयुक्त उमेदवार उभा केला. त्यामुळे महापौर निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय निश्चित मानला जात होता.

बाजी पलटली अन् भाजपाचा विजय झाला

सर्व २५ नगरसेवक आणि खासदार किरण खेर यांनी महापौर निवडणुकीसाठी मतदान केले. मतदानानंतर मतमोजणी सुरू झाली. भाजपा उमेदवाराच्या बाजूने १६ मते पडली. मात्र, काँग्रेस-आप उमेदवाराच्या बाजूने पडलेल्या २० पैकी ८ मते रद्द ठरवण्यात आली. यानंतर दोन्ही पक्षांच्या संयुक्त उमेदवाराला केवळ १२ वैध मते मिळाली. भाजपा उमेदवार मनोज सोनकर यांच्या बाजूने १६ मते पडली. मतमोजणीनंतर भाजपचा उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.

दरम्यान, चंदीगड महापौर निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करत आम आदमी पक्षाने न्यायालयात जाण्याचे जाहीर केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून, महापौरपदाच्या निवडणुकीत दिवसाढवळ्या बेईमानी करण्यात आली आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत हे लोक खालच्या पातळीवर जाऊ शकतात, तर देशातील निवडणुकीत कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा आरोप केला आहे. 
 

Web Title: bjp victory and congress aap india alliance defeat in chandigarh mayor elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.