BJP MLA beaten by police officer bat | भाजप आमदाराची पालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण
भाजप आमदाराची पालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण

नवी दिल्ली - मध्यप्रदेशमध्ये एका भाजप आमदाराची गुंडगिरी पहायला मिळाली. जुन्या जिर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या इंदूर पालिकेच्या अधिकाऱ्याला भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी चक्क बॅटने मारहाण केली असल्याचे समोर आले आहे. आकाश विजयवर्गीय हे मध्यप्रदेशचे भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आहेत.

इंदूर परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्यामुळे, या परिसरातील जुन्या जिर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना आकाश विजयवर्गीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. यादरम्यान स्वतः आकाश हे अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. आकाश इंदुर- ३ मतदारसंघातून आमदार आहेत.

जुन्या जिर्ण झालेल्या घरांना तोडण्यासाठी अधिकारी आल्यावर स्थानिकांनी आकाश यांना बोलावले. त्यानंतर अधिकारी आणि आकाश यांच्यात घर पाडण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. त्यानंतर आकाश यांच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीची चावी काढून घेतली. तुम्हाला १० मिनटांचा वेळ देतो येथून निघून जा नाहीतर जे होईल त्याची जबाबदारी तुमची असेल, अशी धमकी आकाश यांनी अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर आकाश यांनी बॅटने अधिकाऱ्यांना मारणे सुरू केले. यावेळी पोलिस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कसे-बसे अधिकाऱ्याला तेथून बाहेर काढले.

 


Web Title: BJP MLA beaten by police officer bat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.