लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर; तेलंगणातील 'या' 6 उमेदवारांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 07:46 PM2024-03-13T19:46:06+5:302024-03-13T19:46:06+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे.

BJP Candidates 2nd List 2024 Lok Sabha Elections: BJP 2nd list for Lok Sabha announced; 6 candidates from Telangana | लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर; तेलंगणातील 'या' 6 उमेदवारांना संधी

लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर; तेलंगणातील 'या' 6 उमेदवारांना संधी

BJP Candidates 2nd List 2024 Lok Sabha Elections: भारतीय जनता पक्षाने बुधवारी (13 मार्च) लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत अनेक विद्यमान खासदारांची तिकीटे कापण्यात आली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20, कर्नाटकमधील 26, मध्य प्रदेशातील 5, गुजरातमधील 7, तेलंगणा आणि हरियाणातील प्रत्येकी 6, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी 2, दादरा-नगर हवेली आणि त्रिपुरातील प्रत्येकी 1 जागेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. दुसऱ्या यादीत एकूण 72 उमेजवारांची नावे आहेत. 

भाजपने तेलंगणातील 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात आदिलाबादमधून गोदाम नागेश, पेड्डापल्लेमधून गोमासा श्रीनिवास, मेडकमधून माधवनेनी रघुनंदन राव, महबूबनगरमधील डीके अरुणा, नलगौडामधून सईदा रेड्डी आणि महबुबाबादमधून अजमीरा नाइक यांच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, भाजपने तेलंगणातील इतर 9 उमेदवारांची घोषणा आपल्या पहिल्या यादीत केली आहे.

भाजपने आपल्या पहिल्या यादीत 194 उमेदवार जाहीर केले होते, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह 34 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश होता. पक्षाच्या पहिल्या यादीत 28 महिला आणि 47 तरुणांचा समावेश आहे, तर 27 उमेदवार अनुसूचित जाती, 18 अनुसूचित जमाती आणि 57 इतर मागासवर्गीय आहेत.

या यादीत उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्य प्रदेशातील 24, गुजरात आणि राजस्थानमधील 15-15 जागा, केरळ आणि तेलंगणातील 12-12 जागा, झारखंड, छत्तीसगड आणि आसाममधील 11-11 जागा आणि दिल्लीतील पाच जागांचा समावेश होता. आता आज अखेर भाजपची दुसरी यादी जाहीर झाली. 

 

 

Web Title: BJP Candidates 2nd List 2024 Lok Sabha Elections: BJP 2nd list for Lok Sabha announced; 6 candidates from Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.