‘इथून मीच निवडणूक लढवणार, अद्याप उमेदवारी अर्ज भरणं बाकी’, मोदींच्या मंत्र्याचं भाजपाला थेट आव्हान  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 03:23 PM2024-04-11T15:23:32+5:302024-04-11T15:24:43+5:30

Bihar Lok Sabha Election 2024: बिहारमधील बक्सर मतदारसंघातील भाजपाचे (BJP) विद्यमान खासदार असलेले अश्विनी चौबै (Ashwini Choubey) उमेदवारी नाकारली गेल्यानंतर संतप्त झाले असून, मी बक्सरमध्येच राहीन, असं सांगत त्यांनी थेट पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिलं आहे.

Bihar Lok Sabha Election 2024: 'I will contest the election from Buxar, I still have to fill the nomination form', Narendra Modi's minister Ashwini Choubey directly challenged the BJP | ‘इथून मीच निवडणूक लढवणार, अद्याप उमेदवारी अर्ज भरणं बाकी’, मोदींच्या मंत्र्याचं भाजपाला थेट आव्हान  

‘इथून मीच निवडणूक लढवणार, अद्याप उमेदवारी अर्ज भरणं बाकी’, मोदींच्या मंत्र्याचं भाजपाला थेट आव्हान  

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडताना भाजपाने यावेळी अनेक विद्यमान खासदार आणि काही मंत्र्यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यातील अनेकांना पक्षाचा निर्णय मान्य केला आहे. मात्र काहींनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, मोदी सरकारमधील मंत्री आणि बिहारमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेल्या अश्विनी चौबै यांचही तिकीट कापण्यात आलं असून, त्यांच्या बक्सर लोकसभा मतदारसंघामधून मिथिलेश तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बक्सर मतदारसंघातील विद्यमान खासदार असलेले अश्विनी चौबै उमेदवारी नाकारली गेल्यानंतर संतप्त झाले असून, मी बक्सरमध्येच राहीन, असं सांगत त्यांनी थेट पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिलं आहे.

आता अश्विनीकुमार चौबे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते म्हणताहेत की, अजून उमेदवारी अर्ज दाखल करणं बाकी आहे. खूप काही घडणार आहे. कुणाला काय समजलं, काय कळलं नाही, हे मला माहिती नाही. मात्र काही कटकारस्थानी आहेत जे निवडणुकीनंतर उघडे पडणार आहेत. जे काही घडेल ते मंगलमय घडेल, असेही ते म्हणाले. अश्विनी चौबे यांनी ही विधानं त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केली होती. त्याचे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.

बक्सर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचा दबदबा राहिलेला आहे. १९९६ पासून २०१९ पर्यंत केवळ २००९ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता भाजपाचा उमेदवार सातत्याने निवडून आलेला आहे. दरम्यान, अश्विनी चौबे यांनीही येथून २०१४ आणि २०१९ मध्ये विजय मिळवलेला होता. मात्र २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील सर्व जागांवर महाआघाडीचे उमेदवार विजयी झाले होते. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने अश्विनी चौबे यांच्याऐवजी गोपालगंज जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मिथिलेश तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी मंत्री सुधाकर सिंह यांचं आव्हान असेल. तसेच आयपीएसची नोकरी सोडून राजकारणात उतलेले आनंद मिश्रा हे येथून अपक्ष निवडणूक लढवत आहेत.  

Web Title: Bihar Lok Sabha Election 2024: 'I will contest the election from Buxar, I still have to fill the nomination form', Narendra Modi's minister Ashwini Choubey directly challenged the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.