एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 18:54 IST2024-06-02T18:54:27+5:302024-06-02T18:54:41+5:30
लोकसभा निवडणुकीत भाजपात गेलेले आपचे आमदार शीतल अंगुराल यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे.

एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
पंजाबमध्ये एनडीएची डाळ शिजताना दिसत नाहीय. एक्झिट पोलनी एनडीएला २ जागा मिळत असल्याचे दाखविले आहे. येथे काँग्रेस आणि आपमध्येच टक्कर असली तरी देखील भाजपाला त्याचा फायदा उठविता आलेला नाहीय. अशातच आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात गेलेल्या आमदाराने आपला राजीनामा मागे घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपात गेलेले आपचे आमदार शीतल अंगुराल यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. याबाबत त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. विधानसभा अध्यक्षांनी अंगुराल यांना ३ जूनला पडताळणी करण्यासाठी बोलविले होते. परंतु, यापूर्वीच अंगुराल यांनी राजीनामा मागे घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात २७ मार्चला ते भाजपात गेले होते.
पंजाबमध्ये एक्झिट पोलचा अंदाज काय...
पंजाबमध्ये एक्झिट पोलचा अंदाज आला आहे. १३ पैकी २ ते ४ जागा एनडीए युतीला तर काँग्रेसला ७ ते ९ जागा मिळताना दिसत आहेत. तर आपला ०-२ जागा मिळताना दिसत आहेत. शिरोमणी अकाली दलाला २-३ आणि अपक्षाला १ अशा जागा मिळताना अॅक्सिस माय इंडियाने दाखविले आहे.
न्यूज १८ च्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला ९-१० जागा मिळताना दिसत आहेत. भाजपाला २-४ जागा तर आपला मोठा फटका दिसत आहे. ABP News C-वोटरने आप - 3-5, काँग्रेस- 6-8, भाजपा- 1-3 जागा मिळताना दिसत आहेत. जन की बातने आप - 6-4, काँग्रेस- 4-5, भाजपा- 3-2 जागा दाखविल्या आहेत.