Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 14:42 IST2024-05-21T14:33:59+5:302024-05-21T14:42:38+5:30
Lok Sabha Election 2024 Arvind Kejriwal And Sunita Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासोबत सभा घेतली. याच दरम्यान सुनीता केजरीवाल यांनीही लोकांना संबोधित केलं.

Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासोबत सभा घेतली. याच दरम्यान सुनीता केजरीवाल यांनीही लोकांना संबोधित केलं आणि त्यांच्या पतीला पुन्हा जेलमध्ये पाठवू नये यासाठी आम आदमी पार्टीच्या बाजूने मतदान करण्याचं आवाहन केलं. सुनीता म्हणाल्या की, तुमच्या आशीर्वादाचेच फळ आहे की आज माझे पती आमच्यासोबत आहेत. जे चांगलं काम करतात त्यांना देव मदत करतो. आता माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर 25 मे रोजी आपच्या बाजूने मतदान करा.
आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अनुपस्थितीत निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळल्याबद्दल पत्नी सुनीता केजरीवाल यांचं भरभरून कौतुक केलं आणि त्यांना 'झाशीची राणी' म्हटलं. सोमवारी निवडणूक सभांमध्ये सुनीता केजरीवालही पहिल्यांदाच अरविंद केजरीवाल यांच्यासोबत दिसल्या.
अरविंद केजरीवाल पूर्व दिल्लीतील गांधीनगर येथे एका सभेत म्हणाले की, "आज मी माझ्या पत्नीलाही सोबत घेऊन आलो आहे. माझ्या अनुपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला. मी जेलमध्ये असताना ती मला भेटायला यायची. मी तिला माझ्या दिल्लीकरांच्या आरोग्याबद्दल विचारायचो आणि माझा निरोप तुम्हाला पाठवत असे. ती झाशीच्या राणीसारखी आहे."
"अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार"
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यासाठी भाजपाने सोमवारी 2014 ची घोषणा बदलली आणि "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार" असं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अरविंद केजरीवाल यांनी सत्तेवर आल्यास दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार केला.
"मोदीजींचे सरकार चार जूनला स्थापन होणार नाही”
"मी तुम्हाला सांगतोय की, मोदीजींचे सरकार चार जूनला स्थापन होणार नाही. त्यांच्या राजवटीत महागाई आणि बेरोजगारीमुळे सर्वत्र लोक त्यांच्यावर नाराज आहेत, लोकांनी त्यांना (सत्तेवरून) हटवण्याचे ठरवले आहे. चार जून रोजी अच्छे दिन येणार आहेत आणि मोदीजी जाणार आहेत" असंही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.