प्रादेशिक पक्षांना मत म्हणजे भाजपाला मत; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं मुस्लीमांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:21 IST2024-11-12T13:19:55+5:302024-11-12T13:21:36+5:30

राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. केवळ गांधीच मोदींना हरवू शकतात असं रेवंत रेड्डींनी सांगितले. 

A vote for regional parties means a vote for BJP; Congress CM Revanth Reddy appeal to Muslim | प्रादेशिक पक्षांना मत म्हणजे भाजपाला मत; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं मुस्लीमांना आवाहन

प्रादेशिक पक्षांना मत म्हणजे भाजपाला मत; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं मुस्लीमांना आवाहन

हैदराबाद - जर तुम्ही कायम प्रादेशिक पक्षांना मतदान करत राहिला तर शेवटी ते भाजपा सरकारला पाठिंबा देतात. संविधान आणि आरक्षण वाचवायचं असेल काँग्रेसला मतदान करा असं आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मुस्लीम समाजाला केले आहे. या देशात फक्त २ पक्ष आहेत. एक मोदी परिवार आणि दुसरा गांधी परिवार असंही रेड्डी यांनी म्हटलं. हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय शिक्षण दिन आणि अल्पसंख्याक जागृती दिन कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केले आहे. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की, मोदी परिवार देशाचे धर्माच्या नावाने विभाजन करत आहे तर गांधी परिवार या देशाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतायेत. भाजपा संविधानाने तुम्हाला दिलेला अधिकार आणि आरक्षण काढून घेईल. त्यामुळे प्रादेशिक पक्षाच्या गोड बोलण्याला भुलून तुम्ही काँग्रेसपासून अंतर ठेवू नका. काँग्रेस कोणत्याही भेदभावाशिवाय हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही दोन डोळ्यासारखे मानते पण काही वेळा अल्पसंख्याकांनी प्रादेशिक पक्षांना पाठिंबा दिला आहे. मुस्लीम भावनिक आहेत. रमजानमध्ये ते शेरवाणी घालतात, तुमच्यासोबत बिर्याणी खातात. या भावनेतून तुम्ही प्रादेशिक पक्षांना पाठिंबा देता पण आता विचार करा. ते तुमची मते घेतात आणि दिल्लीत कोणाला पाठिंबा देतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसेच आगामी महाराष्ट्र, झारखंड निवडणुकीनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणे गरजेचे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीयदृष्ट्या मजबूत झाल्यास ते संविधान बदलतील आणि मुस्लिम आरक्षण रद्द करतील. अल्पसंख्याकांनी त्यांच्या कुटुंबाला, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला सांगायला हवे जे महाराष्ट्रात राहतात. भाजपाला हरवा आणि काँग्रेसच्या विजयासाठी मतदान करा. काँग्रेसने अल्पसंख्याकांना कधीही व्होट बँक म्हणून वागवले नाही, तर कुटुंबातील सदस्य आणि भारताचे नागरिक म्हणून वागणूक दिली असंही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, गेल्या काही वर्षात काँग्रेस निवडणुकांमध्ये जिंकली आणि हरली. परंतु यंदा विजय महत्त्वाचा आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. केवळ गांधीच मोदींना हरवू शकतात. मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला तिथे मोदी भेटायलाही गेले नाहीत पण राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई अशी देशाला एकत्र ठेवणारी भारत जोडो यात्रा काढली अशी आठवणही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी करून दिली. 

Web Title: A vote for regional parties means a vote for BJP; Congress CM Revanth Reddy appeal to Muslim