8 supporters of Bhumata Brigade along with Trupti Desai were arrested by the Hyderabad police | तृप्ती देसाईंसह भूमाता ब्रिगेडच्या 8 समर्थक हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात 
तृप्ती देसाईंसह भूमाता ब्रिगेडच्या 8 समर्थक हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात 

हैदराबाद -  भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना तेलंगाणातील हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तृप्ती देसाई या तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या घराबाहेर निदर्शन करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी, तेथील पोलिसांनी तृप्ती देसाई यांच्यासह त्यांच्या महिला समर्थकांना ताब्यात घेतलं आहे. हैदराबादेतील बलात्कार आणि मर्डर प्रकरणातील पीडित कुटुंबास न्याय देण्याच्या मागणीसाठी तृप्ती देसाई हैदरबादला गेल्या आहेत. 

तृप्ती देसाई यांनी पुण्यातून हैदराबादल गाठलं असून सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी तेलंगणा सरकारकडे केली आहे. तृप्ती देसाईंसह भूमाता ब्रिगेडच्या 8 महिला पदाधिकाऱ्यांना हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांना प्रियांका रेड्डी बलात्कार प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयात जाब विचारण्यासाठी तृप्ती देसाई त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. याप्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणीही देसाई यांनी केलीय. 

चंद्रशेखर राव यांना लग्नसमारंभात जायला वेळ आहे, पण पीडित कुटुंबीयांना भेट देण्यास वेळ नसल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय. तृप्ती देसाई या महिलांच्या मुद्द्यावरुन सातत्याने पुढाकार घेऊन आपली भूमिका मांडत असतात. मग, त्या महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राबाहेर, महिलांप्रश्नी त्या आक्रमक होतात. 
 

Read in English

Web Title: 8 supporters of Bhumata Brigade along with Trupti Desai were arrested by the Hyderabad police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.