गुजरातमधील पोरबंदरच्या बाहेरील विमानतळावर तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून ३ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 09:43 IST2025-01-06T09:43:12+5:302025-01-06T09:43:38+5:30
आयसीजीचे ‘ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर’ नेहमीच्या उड्डाणावरून परतत असताना रात्री १२:१० वाजता ही घटना घडली

गुजरातमधील पोरबंदरच्या बाहेरील विमानतळावर तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून ३ ठार
पोरबंदर : गुजरातमधीलपोरबंदरच्या बाहेरील विमानतळावर रविवारी दुपारी भारतीय तटरक्षक दलाचे (आयसीजी) हेलिकॉप्टर कोसळले आणि त्यात तीन क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ही माहिती दिली. आयसीजीचे ‘ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर’ नेहमीच्या उड्डाणावरून परतत असताना रात्री १२:१० वाजता ही घटना घडली. धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात हेलिकॉप्टर कोसळले आणि आग लागली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. तिन्ही क्रू मेंबर्सना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले आणि पोरबंदर रुग्णालयात नेण्यात आले.
वजन वाढले, पवारांचे हेलिकाॅप्टर हवेतच
चिपळूण : येथील एक कार्यक्रम आटाेपून परतताना हेलिकाॅप्टरचे वजन वाढल्याने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे हेलिकाॅप्टर २० मिनिटे हवेतच हाेते. वैमानिकाने सलग दाेनदा ‘टेकऑफ’चा प्रयत्न केला. अंगरक्षकाला खाली उतरवल्यानंतर हेलिकाॅप्टरने उड्डाण केले.