‘पीओके’ ही लक्ष्मणरेखा नव्हे! परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 09:31 IST2024-05-17T09:30:48+5:302024-05-17T09:31:27+5:30
१० वर्षांपूर्वीपर्यंत याबाबत कुणी शब्दही काढत नव्हते, आता मात्र तो भारतात कधी येईल, अशा चर्चेपर्यंत बदल झाल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.

‘पीओके’ ही लक्ष्मणरेखा नव्हे! परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : पाकव्याप्त काश्मीरची सीमारेषा ओलांडू नये अशी लक्ष्मणरेषा नाही. किंबहुना ती कुणाच्या तरी चुकीमुळे ७० वर्षांपूर्वी आखली गेलेली एक रेषा आहे. तो भाग भारतात आणण्याचा ठराव संसदेने कित्येक वर्षांपूर्वी संमत केला होता. मात्र, १० वर्षांपूर्वीपर्यंत याबाबत कुणी शब्दही काढत नव्हते, आता मात्र तो भारतात कधी येईल, अशा चर्चेपर्यंत बदल झाल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.
ते म्हणाले, २०११ मध्येदेखील भारतावर हल्ला झाला, त्यावेळी आपण पाकला धडा शिकवला नाही. मात्र, सरकार बदलल्यानंतर उरी आणि पुलवामानंतर जे प्रत्युत्तर दिले ते बदललेल्या भारताची भाषा आहे. रशिया-युक्रेन युद्धावेळी भारताने रशियाकडून इंधन खरेदी केल्याने आपल्यावर टीका झाली. टीकेला घाबरून निर्णय बदलला असता तर पेट्रोल, डिझेलसाठी प्रतिलिटर आणखी २० रुपये मोजण्याची वेळ नागरिकांवर आली असती, असेही जयशंकर म्हणाले.